‘सारी’चे वाढले आणखी चार रुग्ण 

Corona News Aurangabad
Corona News Aurangabad

औरंगाबाद : शहरात एकीकडे ‘कोरोना’चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना सुरू आहेत; तर दुसरीकडे ‘सारी’चे रुग्ण वाढत आहेत. ‘सारी’चे आठ रुग्ण आढळून आले होते. त्यात आणखी चार जणांची भर पडली आहे. त्यामुळे महापालिकेच्या आरोग्य विभागाची चिंता वाढली आहे. 

शहरात कोरोना पॉझिटिव्ह महिला रुग्ण आढळून आल्यानंतर प्रशासकीय यंत्रणा सतर्क झाली आहे. त्यानंतर ही महिला बरी होऊन घरी परतली आहे. दरम्यानच्या काळात शहरातील एकाही रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आलेला नाही. त्यामुळे प्रशासनाला काही प्रमाणात दिलासा मिळाला; मात्र दुसरीकडे ‘कोरोना’सारखीच लक्षणे असलेल्या ‘सारी’ या आजाराची लागण झालेला एक रुग्ण आढळून आला. दोन दिवसांपूर्वीच त्याला खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. ‘सारी’च्या आजाराने एकाचा मृत्यू झाल्याचे कळताच आरोग्य विभाग खडबडून जागा झाला.

आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी शहरातील सर्व खासगी रुग्णालयांकडून सारी आजाराने दाखल असलेल्या रुग्णांचा अहवाल मागविला. त्यानुसार दहा रुग्णालयांत पाचजण दाखल असून, एकाचा मृत्यू झाला आहे. सध्या चार जणांवर उपचार सुरू आहेत. दोघांच्या रक्ताचे व लाळेचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले असल्याचे डॉ. पाडळकर यांनी सांगितले. रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे महापालिकेच्या आरोग्य विभागाचे टेन्शन मात्र वाढले आहे. सारी व कोरोनाची लक्षणे सारखीच असून, सारीच्या रुग्णांच्या लाळेचे व रक्ताचे नमुने तपासणी पाठविण्यात आले होते. सात जणांचे अहवाल निगेरटीव्ह आल्याचे डॉक्टरांनी सांगितले. 
 
घाटीत आढळले १२ रुग्ण 
शहरातील खासगी रुग्णालयापाठोपाठ शासकीय वैद्यकीय महाविद्याय व रुग्णालयात देखील सारीचे रुग्ण दाखल आहेत. ही संख्या तब्बल १२ एवढी आहे. रुग्णांच्या वाढत्या संख्येबद्दल जागतिक आरोग्य संघटनेचे डॉ. मुजीब यांनी चिंता व्यक्त केली आहे. सारीचे मराठवाड्याती किती रुग्ण आहेत? याची माहिती अद्याप समोर आलेली नाही, असे त्यांनी नमूद केले. 

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

महाराष्ट्रातील इतर बातम्या बाचण्यासाठी - क्लिक करा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com