सावित्रीबाई फुले जंयती ः शिक्षिकांनी केल्या भावना व्यक्त

संग्रहीत छायाचित्र
संग्रहीत छायाचित्र

औरंगाबाद - भारतीय स्त्रीदास्यमुक्तीच्या आणि स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या. प्रथम शिक्षिका क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची शुक्रवारी (ता. तीन) जयंती. महात्मा जोतिराव फुले यांनी हाती घेतलेल्या समाजोद्धाराचा वसा तितक्‍याच नेटाने सावित्रीबाईंनी पुढे नेला. शोषित, पीडितांना अंधारातून बाहेर काढण्यासाठी त्यांनी पेटविली उत्क्रांतीची ज्योत धगधगत ठेवून त्यांना कायम कृतीतून अभिवादन करण्याचा प्रयत्न असेल, अशा भावना शहरातील महिला शिक्षकांनी "सकाळ'जवळ व्यक्त केल्या. 


स्त्री शिक्षणासारख्या महत्त्वाच्या विषयात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे योगदान मोठे आहे. त्यांच्या कार्याला यथोचित सन्मान मिळायला हवा, त्यांचा शिक्षणाचा वसा चालवणाऱ्या आम्ही शिक्षिका त्यांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून विद्यार्थिनींना ज्ञानार्जन करत असतो. प्रतिकुल परिस्थितीत त्यांनी शिक्षण घेतले. त्यासाठी अंगावर शेण झेलेले. म्हणून आज आम्हाला फुलांचे हार मिळत आहेत. त्यांच्या विचारांवर वाटचाल करून कायम सावित्रीबाईंना अभिवादन करणार आहे. 
- मंगला निकाळजे 

एक जानेवारी 1848 ला महात्मा जोतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले या दांपत्याने पुण्यातील भिडेवाड्यात मुलींसाठी पहिलीच शाळा सुरू केली होती. सावित्रीबाई फुले यांची आज जयंती. त्यांचे विचार समाजात रुजावे, यासाठी सदोसदित प्रयत्नशील असते. सावित्रीबाईंमुळे आज महिला, मुली शिकत आहेत. शिक्षणाची ही ज्ञानगंगा तळागाळापर्यंत पोचावी, यासाठी सामुदायिक प्रयत्न हवेत. 
- अंजली चिंचोलीकर 

 

महाराष्ट्रात स्त्री शिक्षणाचा पाया रोवणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती महिला मुक्तीदिन, बालिका दिन म्हणून सर्वत्र साजरी होते. मुलींसाठी शिक्षणाचा पाया रोवणाऱ्या सावित्रीबाई फुले यांनी त्याकाळी अनेक संकटांना समारे जाऊन शिक्षण घेतले. समाजकंटकांनी त्यावेळी त्यांना केलेला विरोध त्यांनी जुमानला नाही. महात्मा जोतिबा फुले यांच्या खांद्याला खादा लावून त्यांनी शिक्षण घेतले आणि मुलींना शिक्षणाची वाट मोकळी करून दिली. त्यांच्या या कार्यामुळे समाजात आज महिलांना मानसन्मान मिळत आहे. एक महिला, शिक्षिका म्हणून सावित्रीबाईंचा वसा मी पुढे नेणार आहे. 
- मंजुश्री राजगुरू 

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com