लॉकडाऊनच्या काळात चक्क विद्यार्थ्यांची पळवापळवी, कुठे ते वाचा..! 

संदीप लांडगे
रविवार, 5 जुलै 2020

पटसंख्या टिकवण्यासाठी शहरासह ग्रामीण भागातील शाळेतून विद्यार्थ्यांची पळवापळवी सुरू झाली आहे. त्यामुळे सर्व शाळांमध्ये ‘विद्यार्थी बचाव और बढाओ’ मोहीम जोरदार सुरू आहे. 

औरंगाबाद : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता राज्यातील शाळा विद्यार्थ्यांसाठी कधी सुरू होतील याबाबत अद्याप अनिश्‍चितता आहे. असे असले तरी प्राथमिक, माध्यमिकच्या वर्गात प्रवेश वाढवण्यासाठी शिक्षण संस्थांमध्ये स्पर्धा रंगली आहे. पटसंख्या टिकवण्यासाठी शहरासह ग्रामीण भागातील शाळेतून विद्यार्थ्यांची पळवापळवी सुरू झाली आहे. त्यामुळे सर्व शाळांमध्ये ‘विद्यार्थी बचाव और बढाओ’ मोहीम जोरदार सुरू आहे. 

घरातल्या घरात तपासणीकडे वाढला कल, आरोग्याबाबत लातूरकर जागरूक   

शासनाने शाळा सुरू करण्याबाबत १५ जूनला परिपत्रक जारी केले होते. त्यामध्ये नॉनरेड झोनमधील नववी, दहावी, बारावीच्या शाळा, महाविद्यालये जुलैमध्ये, सहावी ते आठवी ऑगस्टमध्ये; तर पहिली ते पाचवीचे वर्ग सप्टेंबरमध्ये सुरू करण्यासंदर्भात सूचित केले होते; तसेच संबंधित जिल्ह्यातील कोरोनाचा संसर्ग व प्रतिबंधित क्षेत्राची परिस्थिती पाहून शाळा सुरू करण्याचा निर्णय स्थानिक प्रशासनाने घेण्याच्याही सूचना दिल्या होत्या. 

औरंगाबादच्या ‘घाटी’ रुग्णालयात प्लाझ्मा थेरपीसाठी हालचाली   

कोरोनाचे संकट पाहता यंदा जुलैपासून टप्प्याटप्याने शाळा सुरू करण्याचे नियोजन शिक्षण विभागाने केले होते. मात्र, मागील काही दिवसांपासून राज्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. त्यामुळे या वेळापत्रकांबाबत सध्या तरी अनिश्‍चितता आहे. असे असताना माध्यमिक, प्राथमिक शाळांमध्ये विद्यार्थी आपल्याकडे खेचण्यासाठी संस्था आणि शिक्षकांकडून जोरदार प्रयत्न केले जात आहेत. 

पालकमंत्र्यांपासून अल्पभूधारक शेतकरी ठेवले चार हात दूर, कृषी विभागावर शेतकरी संतापले  

पालकांना विविध आमिषे 
विद्यार्थ्यांना आपल्या शाळेत खेचण्यासाठी मुख्याध्यापक, शिक्षकांच्या गावपरिसरात विद्यार्थी शोधमोहीम सुरू आहे. काही शाळांकडून दुसऱ्या गावातील शाळांमधील विद्यार्थी आपल्याकडे कसे येतील यासाठी जोरदार प्रयत्न केले जात आहेत. प्रत्येक विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन शिक्षक, संस्थाचालक विद्यार्थी आपल्या शाळेत प्रवेशित करण्यासाठी पालकांकडे गळ घालत आहेत. त्या बदल्यात शुल्क कमी करणे, विद्यार्थ्याला बससुविधा, शाळेत सर्व सुखसुविधा उपलब्ध आहेत, अशी आमिषे दाखवली जात आहेत. काही संस्थाचालक, शिक्षक विद्यार्थ्यांचे आधारकार्ड, विद्यार्थी आयडीसुद्धा घेत असल्याचे प्रकार घडत आहेत.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: School Save and Increase Students campaign