पाणबुड्यांची शोध मोहीम, दिवसभरात बंद केल्या तब्बल १३ गळत्या ! 

पानबुडी.jpg
पानबुडी.jpg

औरंगाबाद : महापालिकेने कोट्यावधी रुपये खर्च करून क्रांती चौक ते रेल्वेस्टेशन रस्ता सिमेंटचा केला आहे. नेमकी याच रस्त्यावर पाइपलाइनला गळती लागली. त्यामुळे रस्ता फोडण्याची वेळ आली. मात्र पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता किरण धांडे यांनी शक्कल लढविली. पुण्याहून पाणबुड्या मागविण्यात आला. ७०० मिलिमिटर व्यासाच्या पाइपलाइनमध्ये सकाळी गेलेल्या पाणबुड्याने दिवसभरात १३ गळत्या शोधून काढल्या. त्यामुळे नवा रस्ता फोडण्याचे संकट टळले. 


शहराच्या जुन्या पाइपलाइन अत्यंत जीर्ण झाल्या आहेत. त्या जागोजाग फुटत असून, दुरुस्तीसाठी महापालिकेला कसरत करावी लागत आहे. गोपाळ टी हाऊसजवळ ७०० मिलिमिटर व्यासाच्या पाइपलाइनला काही दिवसांपूर्वी गळती लागली होती. नागरिकांनी थेट आयुक्तांकडे तक्रार केल्यामुळे दुरुस्तीसाठी प्रयत्न सुरू होते. मात्र ही पाइपलाइन काँक्रीटच्या रस्त्याच्या मध्यभागातूनच गेलेली आहे. त्यामुळे नवा रस्ता फोडून काम करावे लागणार होते. पाणीपुरवठा विभागाच्या कर्मचाऱ्यांनी रस्त्याच्या आजूबाजूने खोदून दुरुस्तीचा प्रयत्न केला पण यश आले नाही. ही पाइपलाइन सिमेंटची असल्याने गळती वाढण्याचा धोका होता.

त्यामुळे कार्यकारी अभियंता श्री. धांडे यांनी पुण्याहून पाणबुड्यांना पाचारण केले. तीन दिवसांच्या पाठपुराव्यानंतर मंगळवारी (ता. २९ ) सकाळी पाणबुडे शहरात झाले. सकाळी साडेनऊ वाजता ज्या ठिकाणी लोखंडी पाइपलाइन आहे, तिथे छिद्र पाडून त्यातून पाणबुड्यांनी प्रवेश केला. दिवसभरात १३ ठिकाणच्या गळत्यांना जोडण्यात त्यांना यश आले. रात्री उशिरापर्यंत आणखी गळत्यांचा शोध पाणबुडे घेत होते. काम पूर्ण करूनच पाणबुडे बाहेर येणार असल्याचे श्री. धांडे यांनी सांगितले. 

खर्चात बचत 
रस्ता खोदून नव्याने करण्यासाठी महापालिकेला मोठा खर्च आला असता. मात्र पाणबुड्यांमुळे हा खर्च वाचला आहे. विशेष म्हणजे इतर १३ गळत्या देखील बंद झाल्या आहेत. 

(संपादन-प्रताप अवचार) 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com