Meerabai Upam News
Meerabai Upam News

शाहीर मीराबाई उमप यांना मदत, पेटली घरातील चूल

औरंगाबाद - ‘कोरोना’मुळे संपूर्ण जग आज संकटाच्या खाईत लोटले आहे. हातावर पोट असलेल्यांसह मजूर, कामगार अशा अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यात लोककलावंतही आहेत. तमाशा, भारूड, गोंधळ, जागरण, दशावतार, लावणी, खडीगंमत, पोवाडा, शाहिरी अशा प्रबोधनात्मक कार्यक्रम करणाऱ्या लाखो कालावंतांवर ‘कोरोना’मुळे उपासमारीची वेळ आली आहे. 

येथील शाहीर मीराबाई उमप यांचा रोजीरोटीचा प्रश्न शिवसेना पूर्वचे शहरप्रमुख विश्‍वनाथ स्वामी, सामाजिक कार्यकर्ते राजू खरे यांनी सोडवून सामाजिक बांधिलकी जपली आहे. आपल्या खड्या आवाजाने तसेच खंजिरीवादनामुळे शाहीर मीराबाई उमप यांनी अवघ्या महाराष्ट्रासह बाहेरील राज्यांनाही भुरळ घातलेली आहे. सध्या, यात्रा-जत्रांचा हंगाम असून, कोरोनामुळे सर्व कार्यक्रमांवर पाणी फेरले आहे. मार्च, एप्रिल आणि मे या तीन महिन्यांत कलावंत वर्षभराची बेगमी करून ठेवतात. मीराबाईंनी आपली करुण कहाणी प्रसिद्ध लोककलावंत आणि मुंबई विद्यापीठांतर्गत लोककला अकादमीचे संचालक शाहीर डॉ. गणेश चंदनशिवे यांच्याकडे कथन केली. उत्पन्नाचे साधन नसल्याने कुटुंबावर उपासमारीची वेळ आली असल्याचे मीराबाईंनी सांगितले. तीन दिवसांपासून घरात चूल पेटली नाही. मायबाप सरकारने आमच्या कलावंतांकडे लक्ष द्यावे. आपण आमची मागणी मायबाप सरकारच्या कानावर घालण्याची विनवणी
मीराबाईंनी डॉ. चंदनशिवे यांच्याकडे केली. 

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

यावर डॉ. चंदनशिवे यांनी सरकार यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगून तूर्तास माझ्यापरीने होईल तेवढी मदत करण्याचा प्रयत्न करतो, असे सांगून औरंगाबादमधील त्यांचे मित्र आणि सामाजिक कार्यकर्ता राजू खरे यांना फोन लावला. मीराबाई उमप यांना तत्काळ मदत करण्याची विनंती केली. शिवसेनेचे पूर्व विभागाचे शहरप्रमुख विश्‍वनाथ स्वामी, राजू खरे यांनी आपल्या मित्रांसमवेत शहरापासून १२ किलोमीटर अंतरावर असलेल्या हिरापूर येथे जाऊन शाहीर मीराबाई उपम यांना मदत केली. त्यांना दोन महिन्यांचे रेशन भरून किराणा सामान दिले आणि आणि मीराबाईंच्या घरची चूल पेटली 

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com