esakal | बिडकीनजवळ लांडग्यांचा मेंढ्यांच्या कळपावर हल्ला, तीस कोकरांचा मृत्यू
sakal

बोलून बातमी शोधा

wolves attack On sheeps babies

औरंगाबाद जिल्ह्यातील बिडकीन (ता.पैठण) जवळील बिडकीन-पैठण रस्त्यावरील एका शेतात शेजारच्या जिल्ह्यातून आलेल्या मेंढ्यांच्या कळपात लांडग्यांनी हल्ला करत तीस कोकरांचा मृत्यू, तर १२ जखमी झाल्याची घटना बुधवारी (ता.१९) पहाटे तीनच्या सुमारास घडली.

बिडकीनजवळ लांडग्यांचा मेंढ्यांच्या कळपावर हल्ला, तीस कोकरांचा मृत्यू

sakal_logo
By
एकनाथ हिवाळे

बिडकीन (जि.औरंगाबाद) : बिडकीन (ता.पैठण) जवळील बिडकीन-पैठण रस्त्यावरील एका शेतात शेजारच्या जिल्ह्यातून आलेल्या मेंढ्यांच्या कळपात लांडग्यांनी हल्ला करत तीस कोकरांचा मृत्यू, तर १२ जखमी झाल्याची घटना बुधवारी (ता.१९) पहाटे तीनच्या सुमारास घडली. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार बाळु चिमाजी वाघमोडे (रा.दिंडेवाडी, ता.शेवगाव, जि.नगर) हा मेंढपाळ गेल्या दहा ते पंधरा दिवसांपासून बिडकीन पैठण मार्गावरील पडीत शेतजमिनीवर जवळपास चारशे मेंढ्या, कोकर व कुंटुंबासह पाल्या टाकुन राहत आहेत.

वाचा : जिल्हा परिषद शाळेचे पोर हुशार; बनवला भाजीपाला, फळे धुण्याचे यंत्र

त्यांच्या पालावर बुधवारी पहाटे पाच-सहा लांडग्यांनी मेंढ्यांच्या कळपावर केलेल्या हल्ल्यात तीस कोकरांचा मृत्यू, तर पंधरा जखमी झाले. दरम्यान पहाटे शिवसेना माजी सरपंच अशोक धर्मे हे व्यायामास जात असताना सदर प्रकार त्यांच्या लक्षात आला व त्यांनी वन विभाग , पशुधन विभाग व महसुल विभागाच्या अधिकाऱ्यांना घटनेची माहीती दिली व मेंढपाळाचे सांत्वन केले.

यावेळी वन परिक्षेत्र अधिकारी शेषराव तांबे, वनपाल मनोज कांबळे, सहायक आयुक्त पशुवैद्यकीय सर्वचिकित्सालय डॉ.निवास भुजंग, पंचायत समिती पशुधन विकास अधिकारी डॉ.गौतम साळवे, डॉ.महेश पवार, डॉ. देवचंद थोरात, तलाठी ज्ञानेश्वर महालकर, वनरक्षक विश्वास साळवे, सचिन तळेकर, राजु जाधव यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. तसेच मेंढपाळास सर्वतोपरी मदत करण्याची आश्नासन दिले. दरम्यान लांडग्याच्या हल्यात मृत्युमुखी पडलेले कोकरे हे साधारणतः केवळ एक महिन्याचे होते. त्यामुळे त्या मेंढपाळाचे एक वर्षाचे उत्पन्न गेले असल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा : आता जंगल होणार ग्लिरीसिडीयामुक्त !


एकदिवसीय यात्रा रद्द
दरवर्षी पोळ्याच्या पाडव्याच्या निमित्त बुधवारी (ता.१९) सारोळा(ता.सिल्लोड) येथे होणारा एकदिवसीय पोळा-पाडवा गयंबानशहावली व गैहिणीनाथाची भव्य एकदिवसीय यात्रा रद्द करण्यात आली. दिवसेंदिवस महामारी कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालेला आहे. याची दक्षता घेत ग्रामपंचायत प्रशासन, मुजावर समिती, पोलीस प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने यात्रेत बंदोबस्त ठेवण्यात आला.

सारोळा येथील यात्रेत हिंदू-मुस्लीम समाजबांधवाच्या ऐक्याचे प्रतिक म्हणून या यात्रेकडे पाहीले जाते. दोन्ही समाजबांधव या यात्रेत लाखोच्या संख्येने सहभागी होऊन यात्रा उत्साहात साजरी करतात. पोळ्याच्या दिवशी शेतकरी आपल्या शेतात राबणाऱ्या बैलांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी याठिकाणी बैलांना दर्शनासाठी घेऊन येतात. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यामुळे ग्रहण लागले ठिकाणी दर्शन घेण्यासाठी येणारे भाविक शेतकरी वर्ग बैलगाडीचा वापर करतात.

(संपादन : गणेश पिटेकर)