esakal | आई आजारी, भावांचाही सांभाळ, कर्ता बनून आठवीतली शीतल देतेय कुटूंबाला आधार
sakal

बोलून बातमी शोधा

Sheetal Rathod

शिकायचे, स्वप्न बघायचे आणि ते पूर्ण करायचे तिचे वय. पण कुटुंबाचा भार आता तिलाच पेलावा लागतोय. म्हणून तिच्या हातात आता खुरपं आलंय. अवघ्या १२-१३ व्या वर्षात दिवसाकाठी दोनशे रुपये कमविणारी शीतल तिच्या जीवनात मात्र शीतलता केव्हा येईल हे तिलाही माहित नाही. ही शीतल आहे मूळची जळगाव जिल्ह्यातल्या गाळण या गावची. पण आईचे आजारपण, घरात दोन लहान भाऊ, त्यातच आता शाळाही कोरोनामुळे बंद झाल्या. त्यामुळे ती मामाच्या गावी आली, पण सुट्यांसाठी नव्हे तर दुसऱ्यांच्या बांधावर खुरपे घेऊन निंदणी अन् खुरपणीला.

आई आजारी, भावांचाही सांभाळ, कर्ता बनून आठवीतली शीतल देतेय कुटूंबाला आधार

sakal_logo
By
सुषेन जाधव

औरंगाबाद: शिकायचे, स्वप्न बघायचे आणि ते पूर्ण करायचे तिचे वय. पण कुटुंबाचा भार आता तिलाच पेलावा लागतोय. म्हणून तिच्या हातात आता खुरपं आलंय. अवघ्या १२-१३ व्या वर्षात दिवसाकाठी दोनशे रुपये कमविणारी शीतल तिच्या जीवनात मात्र शीतलता केव्हा येईल हे तिलाही माहित नाही. ही शीतल आहे मूळची जळगाव जिल्ह्यातल्या गाळण या गावची. पण आईचे आजारपण, घरात दोन लहान भाऊ, त्यातच आता शाळाही कोरोनामुळे बंद झाल्या. त्यामुळे ती मामाच्या गावी आली, पण सुट्यांसाठी नव्हे तर दुसऱ्यांच्या बांधावर खुरपे घेऊन निंदणी अन् खुरपणीला. 

हेही वाचा- Video: ‘ती’ राबते, सर्वांचे मन जपते पण तिच्या मनासारखं होतं का?

नाचनवेल, शेलगावमार्गे घाटनांद्राचा घाट उतरुन जात होतो. घाटाचा उतार संपला की, उजव्या बाजूला आले लागवडीची गडबड दिसली. आलं लागवड करणाऱ्या महिला मजूर पुढे पण दोन मुली त्यांच्या मागून आपली पात (ओळ) संपवण्याची धडपड करत होत्या. शेत मालक सोनू शेठ आल्याला बीजप्रक्रिया करुन देत होते. मागे राहिलेल्या मुलींपैकी शीतल राठोड ही आठवीत शिकते. कोरोनाच्या प्रादूर्भावामुळे शाळा बंद असल्या तरी हिचं घरी थांबणं शक्य नाहीय असं सांगताना शीतल बोलती झाली.

हेही वाचा- शेतकऱ्यांनो...निंबोळी अर्क तयार करण्याची हीच खरी वेळ, विनाखर्च बनविण्याची ही आहे पद्धत

ती म्हणाली, ‘दोन वर्षाआधी आईबाबांसोबत ऊसतोडीला गेले होते. नंतर आईच्या कानाचं ऑपरेशन झाले, अन आमी ऊसतोडीला गेलोच नाही. मला दोन भाऊयेत. त्यातला एक सातवीत, दुसरा पाचवीत. दोघंही माझ्याहून लहान. आईचं मध्येमध्ये दुखणं असतं. मग खर्चायला पैसे नसतात. आता पाऊस पल्डा, तसं मी आलं लावायला जातेय, दिवसभर काम केल्यावर दोनशे रुपये मिळतेत. त्याने बाबांना घर खर्चाला हातभार लागतो.’ 


आधीच कोरोनामुळे शाळा बंद आहेत. त्यात खर्चायची अडचण त्यामुळे शेतात काम करते. लॉकडाऊन संपल्यानंतर शाळा सुरु झाल्यावर पून्हा शाळेत जाणार आहे. कामाच्या पैशांनी तितकाच आधार होतो. 
- शीतल राठोड, बोरमाळ तांडा परिसर. 

go to top