Shivjayanti 2020 : संताप येईल शिवाजी महाराजांच्या मूळ गावातील गढीची अवस्था पाहाल तर

देवदत्त कोठारे 
Tuesday, 18 February 2020

छत्रपती शिवरायांचे मूळ गाव वेरूळ (ता. खुलताबाद) आहे. या गावात भोसले घराण्याच्या ऐतिहासिक गढीचे अवशेष अजूनही आहेत. या स्मारकाची अवस्था पाहाल तर तुम्हाला संताप आल्याशिवाय राहणार नाही. 

खुलताबाद (जि. औरंगाबाद) : अवघ्या महाराष्ट्राची अस्मिता असलेल्या छत्रपती शिवरायांचे मूळ गाव वेरूळ (ता. खुलताबाद) आहे. या गावात भोसले घराण्याच्या ऐतिहासिक गढीचे अवशेष अजूनही आहेत. या स्मारकाची अवस्था पाहाल तर तुम्हाला संताप आल्याशिवाय राहणार नाही. 

या ऐतिहासिक ठेव्याचे जतन व्हावे, यासाठी या ठिकाणी दहा वर्षांपूर्वी शहाजीराजे भोसले यांच्या स्मारकाचे काम हाती घेण्यात आले होते. पण, अजूनही ते पूर्ण झाले नाही. जे काम झाले त्या कामातील वस्तू, फरशा तुटल्या आहेत. स्मारकाला गाजर गवताचा विळखा पडला आहे. काही ठिकाणी भिंतीना तडे गेले असल्याचे चित्र आहे.

Image may contain: sky, tree, plant, grass, house, outdoor and nature

स्मारकाचे काम ठप्प

वेरुळ येथे ता. १७ सप्टेंबर २००८ ला शहाजीराजे भोसले यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण झाले. त्यानंतर पुढे स्मारकाचे काम ठप्प झाले नाही. पहिल्या टप्प्यात स्मारकाची संरक्षण भिंत, मुख्य प्रवेशद्वाराच्या कामावर ३२ लाख रुपये खर्च झाले. दुसरा टप्पा चबुतरा बांधकाम, शहाजीराजेंचा ब्रांझ धातूचा पुतळा, अंतर्गत रस्ते, बाग बगीचा, पाणीपुरवठा यावर ५० लाख रुपये खर्च करण्यात आले.

शिवाजी महाराजांवरील उर्दू पुस्तके संपली...

तिसरा टप्पा स्मारकाच्या परिसरात मराठ्यांचा इतिहास दर्शविणारे संग्रहालयाची इमारत, संभाजीराजे संग्रहालय, सांस्कृतिक सभागृह, संत तुकाराम सांस्कृतिक सभागृह या कामावर एक कोटी ५० लाख रुपये खर्च करण्यात आले. यामध्ये ४९ लाख रुपयांचा निधी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे नऊ वर्षांपासून पडून आहे.

शिवजयंतीनिमित्त महिला सुरक्षेसाठी बनवले अॅप

उर्वरित कामे पूर्ण करण्यासाठी आणखी दोन कोटींची आवश्यकता आहे; मात्र जे काम झाले, त्याचीही देखभाल दुरुस्तीअभावी मोठी दुरवस्था झाली आहे. त्यामुळे याकडे शासनासह शिवप्रेमी संघटनांनी लक्ष देण्याची गरज आहे.

Image may contain: plant, tree, shoes, outdoor and nature

प्रसार-प्रचाराचाही अभाव 

वेरूळ येथे लेण्यासह शहाजीराजेंचे स्मारक आहे, हे अनेकांना माहिती नाही. त्यामुळे येथे देश-परदेशातून रोज मोठ्या संख्येने येऊनसुद्धा ते या स्मारकाला भेट न देताच निघून जातात. त्यामुळे पर्यटन विभागाने या स्मारकाचा प्रचार-प्रसार करणे गरजेचे आहे. स्मारकाराच्या ठिकाणी बांधकाम विभागाने एका कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. दिवसभर हा कर्मचारी गेट उघडून बसतो व सांयकाळी सहा वाजता गेट बंद करतो; पण येथे रोज अपवादाने पर्यटक येतात.

मराठा क्रांती मोर्चामुळे किती विकले गेले झेंडे- वाचा  

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shivaji Maharaj Shahaji Raje Fortress In Ellora Aurangabad Shivjayanti News