देशी संपली, आता गावठीकडे मोर्चा!

प्रकाश बनकर
Saturday, 28 March 2020

ग्रामीण भागात देशीचा स्टॉक संपत आला आहे. याला पर्याय म्हणून गावठी दारूकडे बेवडे वळत आहेत. शहर परिसरातील गावांमध्ये शहरातील बेवड्यांनी दार उघडण्यासाठी दोन-तीन दिवसांपासून चकरा मारल्या मात्र गावकऱ्यांनी आधीच जागरूक झालेले असल्याने त्यांनी हा प्रयत्न हाणून पाडला. 

औरंगाबाद : देशात लॉकडाऊन असल्यामुळे जीवनावश्यक वस्तू वगळता सर्व दुकाने बंद आहेत. त्यामुळे बेवड्यांची मोठी पंचाईत झाली आहे. शहरातील दारू दुकाने बंद असल्यामुळे दोन-तीन दिवसांपासून ग्रामीण भागाकडे दारू घेण्यासाठी बेवड्यांचा मोर्चा वळला होता; मात्र आता देशी दारू संपल्यामुळे काहीजण गावठी दारूकडे वळले आहेत. 

वाळूज, चिकलठाणा शेंद्रा येथील मद्यनिर्मिती करणाऱ्या कंपन्यांनी १८ ते २० मार्चपासून उत्पादन थांबवले आहे. यामुळे २० ते २२ दरम्यान शहरातील परवानाधारक दुकानांतून अनेकांनी स्टॉक भरून घेतला. मात्र १४ एप्रिलपर्यंत देशात लॉकडाऊनची घोषणा झाल्यामुळे ग्रामीण भागातही मद्य विक्री केली जात आहे.

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

आता तर ग्रामीण भागात देशीचा स्टॉक संपत आला आहे. याला पर्याय म्हणून गावठी दारूकडे बेवडे वळत आहेत. शहर परिसरातील गावांमध्ये शहरातील बेवड्यांनी दार उघडण्यासाठी दोन-तीन दिवसांपासून चकरा मारल्या मात्र गावकऱ्यांनी आधीच जागरूक झालेले असल्याने त्यांनी हा प्रयत्न हाणून पाडला. 

ग्रामीण भागात अनेक ठिकाणी छुप्या पद्धतीने गावठी दारू बनवून त्याची विक्री केली जात आहेत. हे प्रकार थांबविण्यासाठी आता गावकऱ्यांनी पुढाकार घेण्याची गरज आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारतर्फे उपाययोजना करण्यात येत आहेत. असे असताना गावकऱ्यांनीही अशा प्रकारांना आळा घालण्याची गरज आहे. याविषयी राज्य उत्पादन शुल्क व पोलिसांकडून गावकऱ्यांना सूचना करण्यात येत आहेत. 

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

जिल्ह्यात सिल्लोड, अजिंठा परिसरात तसेच कन्नड तालुक्यात नागद परिसरात हातभट्टीची गावठी दारू बनवण्यात येते. या दोन्ही ठिकाणी पोलिस आणि राज्य उत्पादन शुल्कच्या अधिकाऱ्यांनी पेट्रोलिंग केली आणि याच भागावर पोलिस आणि राज्य उत्पादक शुल्क विभाग लक्ष ठेवून आहे. 

महाराष्ट्रातील इतर बातम्या बाचण्यासाठी - क्लिक करा

कन्नड आणि अजिंठा भागात गावठी दारू बनविणे सुरू असल्याची माहिती मिळाली. या दोन्ही भागांत पाहणी केली. मात्र इकडे काही आढळून आले नाही. असे असले तरी आमचे या भागावर विशेष लक्ष आहे. 
-एल.के. कदम, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क 

देशी दारू विक्री करणारे व गावठी दारू बनवणाऱ्यांवर आमचे लक्ष आहे. दोन दिवसांपूर्वी आम्ही पानवडोद येथे देशी दारू विक्री करणाऱ्यांवर कारवाई केली. आमचा तपास सुरूच राहील. अशाप्रकारे दारू बनवण्यावर कारवाई करण्यात येईल. 
-किरण आहेर, सहायक पोलिस निरीक्षक, अजिंठा पोलिस ठाणे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shortage In Liquor Stock In Aurangabad In Coronavirus Lockdown