शेतकरी बांधवांनो ! 'सातबारा', 'नमुना आठ-अ' काढायचा वापरा ऑनलाइनची ही साधी पद्धत !

प्रताप अवचार
Tuesday, 15 September 2020

ऑनलाईन सातबारा नेमका काढायचा कसा, त्याची नेमकी पद्धत कशी आहे. हे बर्याच जणांना माहिती नसते. ती या बातमीच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत.

औरंगाबाद : शेतकऱ्यांसाठी सर्वात महत्त्वाची आणि उपयुक्त बाब म्हणजे आपल्या शेतीचा (७/१२) सात-बारा. कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ घ्यायचा असेल किंवा शेताची आत्ताची परिस्थिती काय आहे. यासाठी त्याला प्रामुख्याने सात-बाराची प्रत लागतीच.

 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

आता ऑनलाईनद्वारे सातबाराची प्रत निघते. शेतकर्यांना आपला सातबारा काढताना कोणाचाही मदत घेण्याची गरज नाही. कुठे जाण्याची गरज नाही. तो आपल्या स्मार्ट फोनद्वारे देखील सातबारा पाहू शकतो किंवा त्याला डाऊनलोड करुन घेता येतो. अर्थात ही पद्धत तशी नवीन नाही. मात्र, ऑनलाईन सातबारा नेमका काढायचा कसा, त्याची नेमकी पद्धत कशी आहे. हे बर्याच जणांना माहिती नसते. ती या बातमीच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. चला तर ऑनलाईन सातबारा काढण्याची गावाकडची गोष्ट समजून घेऊया.

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

१) सर्वात प्रथम आपण ज्या सर्च  इंजिनचा (शोध संकेतस्थळाचा)
वापर करता. उदा. गुगल त्यावर जावे.

https://bhulekh.mahabhumi.gov.in/ ही वेबसाईड टाका.
 
२) आपल्‍याला स्क्रीन दिसेल. त्यावर एका बाजूला महाराष्ट्राचा
नकाशा दिसेल, तर दुसर्या बाजूला विभाग निवडा असा पर्याय दिसून येतो. 

३) विभाग निवडा या पर्यायावर आपण सर्च केल्यानंतर सर्वात प्रथम आपला विभाग निवडायचा असतो. या विभागात (अमरावती, औरंगाबाद, कोकण, नागपूर, नाशिक, पुणे ) असे नावे आपणास दिसून येतात. 

या पैकी शेतकर्‍याने आपण कोणत्या विभागात येतो. ते नाव सिलेक्ट करायचे आहे.

४) विभाग निवडल्यानंतर, जिल्हा निवडा असा पर्याय समोर येतो. त्यात सात बारा आणि आठ-अ असा पर्याय दिसून येतो. त्यात कोणता तालुका, त्यानंतर गाव असे पर्याय निवडावे. 

५) वरिल सर्व पर्याय निवडल्यानंतर सहा नवीन ऑप्शन येतात. 
अ) सवर्हे नंबर गट नंबर. 
ब) अक्षरी सवर्हे नंबर गट नंबर.  
क) पहिले नाव. 
ड) आडनाव.
ई) मधले नाव.
फ) संपूर्ण नाव.
वरिल या सर्व नावावरुन आपण आपला सात-बारा किंवा  आठ- अ काढता येईल. 

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

सही, शिक्क्याशिवाय नाही मान्यता
विशेष सुचना म्हणजे या संकेतस्थळावर दर्शविलेली माहिती ही कोणत्याही शासकीय अथवा कायदेशीर बाबींसाठी वापरता येणार नाही. त्यासाठी आपल्या सातबारा, गावनमुना आठ अ ची प्रत आपण पाहू शकतो. किंवा डाऊनलोड करुन घेऊ शकतो. हीच प्रत घेऊन तलाठी, मंडळ अधिकारी, किंवा नायब तहसिलदार यांच्या सही शिक्कानेच ती प्रत सत्यप्रत मानली जाईल. 

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

हीच अपेक्षा, स्मार्ट युवकांनी घ्यावा पुढाकार !
शेतकरी बांधवांना ऑनलाइन पद्धतीन सातबारा काढता येईल का, जर तो शासकीय कामासाठी ग्राह्य धरला जात नसेल तर मग कशासाठी काढायचा असाही प्रश्न अनेकांना पडू शकतो. परंतु ऑनलाइन  संगणक सेंटर मधून सातबारा काढण्यासाठी मोठ्या प्रमाणात शुल्क आकारले जात आहे. त्यात प्रत्येक वेळा महत्वाची कागदपत्र काढताना अधिकचे पैसे मोजावे लागतात. एक प्रकारे शेतकऱ्यांची पिळवणूक केली जाते. त्यामुळे गावागावातील शिक्षण घेतलेल्या युवकांनी आपल्याच शेतकरी बांधवांसाठी मदत केली पाहिजे. स्मार्ट झालेल्या तरुण पिढीने आपल्या स्मार्ट फोनच्या मदतीने आपल्याच शेतकरी बांधवांना मदत केली पाहिजे, एवढीच अपेक्षा आहे.

ऑनलाईनद्वारे सातबारा, नमुना आठ- अ काढता येतो. ही पद्धत अतिशय सोपी आहे. मुळात सातबारा हा शेतकरी बांधवाना अतिशय महत्त्वाचा असतो. शेतीची संपुर्ण कुंडली त्यावर असते. शेतीवर कर्ज आहे का, किती फेरा केलेला आहे. याबाबत सविस्तर माहिती असते. मात्र, ऑनलाईन सातबारा ही प्रत कोणत्याही शासकीय अथवा कायदेशीर बाबींसाठी वापरता येणार नाही. त्यासाठी संबंधित अधिकारायंची सही लागते.  
यादव ग. पारवे, सेवानिवृत्त, नायब तहसिलदार.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Simple online method Use for SATH BARA and AATH-A