मोरानी केली सापाची शिकार 

pecock
pecock

औरंगाबाद- लॉकडाऊनमुळे माणसांचे हाल होत आहेत. माणसांचेच हाल होत असल्याने प्राणी पक्षांकडे दुर्लक्ष होत असल्याने नागरीवस्तीच्या आश्रयाने राहत असलेल्या चार - पाण्याचे हाल होत आहेत. साईच्या परिसरात तर भुकेल्या मोरांनी दोन दिवसांपूर्वी चक्क सापाची शिकार केल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. 

मोरा रे मोरा काय तुझा तोरा, रंगीत पिसारा फुलव जरा असे मोराचे आर्जव बालगीतांतून केले जाते मात्र हा राष्ट्रीय पक्षी त्याच्या मर्जीनुसार पिसारा फुलवतो आणि गिरक्या घेत थुई थुई नाचत असतो. मोराचे अन्न प्रामुख्याने ज्वारी, बाजरी, गहू, हरभरे, मका या धान्यांसह टमाटे, वांगे, कांदा, भाजीपालाही मोठ्या चवीने खातो, तसा मोर सर्वच प्रकारचे खाद्य चालते. त्याचा पिसाऱ्याच्या अदभुत सौंदर्यामुळे त्याला राष्ट्रीय पक्षी घोषित करण्यात आले आहे. 
मानद वन्यजीव रक्षक, पक्षीप्रेमी दिलीप यार्दी म्हणाले, मोर हा प्राणी कमी झाडीच्या जंगलात तसेच नागरी भागाजवळील शेतांमध्ये त्यांचा वावर असतो.मोराला शाकाहार, मांसाहार दोन्ही चालतो.

कडधान्याबरोबरच चोची मारून बारीक किटक, साप, पाली, खारदेखील त्यांचा आहार असतो. लहान सापही ते खातात, मोठ्या सापांच्या वाटेला जात नाहीत, मात्र परिस्थितीनुसार ते मोठ्या सापाचीही शिकार करतात. साप त्यांचे खाद्य आहे. उन्हाळ्याच्या सुरुवातीपासून पिसाऱ्याचे नवीन पंख येण्यास सुरुवात होते. आकाशात ढग दिसायला लागले की ते आवाज करत, पिसारा फुलवून नाच करत मादीला आकर्षित करतात. मोराची अंडी कोंबडीखाली ठेवली तरी ती उबवली जातात. 

एकीसोबत नसतो खूश 
पक्षिमित्र डॉ. किशोर पाठक म्हणाले, प्रदूषण कमी, ध्वनी प्रदूषण कमी, गोंगाट कमी झाला आहे, लोकांची वर्दळ कमी झाली आहे त्यामुळे मोर आता जास्त दिसत आहेत. हिमायतबागेत १० वर्षांपूर्वी ३५० मोर होते आता २५ ते ३० मोर शिल्लक आहेत. विद्यापीठ परिसरात ७० - ७५ मोर आहेत. उन्हाळ्याच्या सुरुवातीला मोरांच्या पिसाऱ्याचे पंख यायला सुरुवात होते. पावसाळ्यात मादीला आकर्षित करण्यासाठी पिसारा फुलवून नाचू लागतो. जूलै ऑगष्टमध्ये पिसाऱ्याचे पंख झडतात. एका मोराच्या समूहात पाच - सहा लांडोर असतात. मोर अन्य पक्षांप्रमाणे एका मादीसोबतच खूश राहत नाही तर अनेक लांडोर सोबत तो राहतो. मोराचे अश्रू पिऊन लांडोरीला गर्भधारणा होते हा समज चुकीचा आहे. सहवासातून गर्भधारणा होत असते. ही कल्पना म्हणजे चातक पक्षी पावसाचे थेंब पिऊनच तहान भागवतो या प्रकारची आहे. पावसाळ्यानंतर झाडांच्या खोडात, ढोलीत पाणी असते ते पाणी पिऊन पक्षी राहतात. चातकही ते पीत असतो. ढोलीतलेही पाणी संपल्यानंतर जमिनीवरचे पाणी पितो. त्याला कोणी पाणी पिताना पाहिले नसल्याने ही कविकल्पना पुढे आली आहे असेच मोरांच्या अश्रूंच्या बाबतीतही म्हणता येईल. 

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

उंचावर काढतात रात्र 
मोर धावत असला तरी त्याला त्याच्या बोजड पिसाऱ्यामुळे फारसे उडता येत नाही. माणुस आणि कुत्र्यांपासून मोराच्या जिवाला भिती असते ,त्यामुळे मोर रात्रीच्यावेळी उंच झाडाचा आश्रय घेतात. रात्रीच्यावेळी झाडाच्या उंच ठिकाणी जाऊन ते बसतात. सकाळी सहा - साडे सहा वाजता झाडावरून खाली उतरतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा परिसर, स्पोर्ट्स एथॉरटी ऑफ इंडिया (साई) व बौद्ध लेणी परिसरात सुमारे ७० ते ७५ मोर असतील असे पक्षिमित्र डॉ. किशोर पाठक यांनी सांगितले. साईच्या परिसरात व विद्यापीठाच्या आमराईत, चिकूच्या बागेत मोठ्या प्रमाणात मोर पाहायला मिळतात. 

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

लॉकडाऊनमुळे मोरांना मिळेना चार-पाणी 
लॉकडाऊनमुळे विद्यापीठातील, साईमधील सर्व विद्यार्थी आपापल्या गावी गेलेले आहेत, पर्यायाने हॉटेल्स, मेस बंद झालेले आहेत. यामुळे मोरांना त्या हॉटेल्स, मेसमधून निघणारे टाकाऊ अन्न, पालेभाज्या मिळेनासे झाले आहे. शिवाय मोकळी मैदानेही उन्हामुळे रखरखीत झाल्याने त्यांना जमिनीतून किटक खायला मिळत नाही. तर पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत आटल्याने मोरांचे चारा - पाण्याचे हाल होत आहेत. साईमध्ये गौरव शेंडे नियमित या मोरांना चारा टाकत असल्याने गौरव जवळ मोर येतात.

येथील कर्मचारी महेश कुसाळे म्हणाले, या भागात ४० ते ५० मोर आहेत. साईच्या मेसमधून त्यांना टाकाऊ अन्न, पालेभाज्या मिळत मात्र सध्या लॉकडाऊनमुळे त्यांच्या चारा पाण्याचा प्रश्‍न गंभीर बनला आहे. दोन तीन दिवसांपूर्वी मोरांनी सापाची शिकार केली त्यांनी साप खाल्ला आहे. अधून मधून त्यांच्यासाठी घरून आम्हीच घरून तांदूळ, गहू असे धान्य आणून टाकतो. पाणी कमी झाल्याने पाइपलाइनला लागलेल्या गळतीचे पाणी पिऊन तहान भागवताना आम्ही पाहतो.  

महाराष्ट्रातील इतर बातम्या बाचण्यासाठीक्लिक करा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com