‘तो’ व्हायरल मेसेज फेक 

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 2 July 2020

‘औरंगाबादच्या कलेक्टरकडून सूचना’ अशा तब्बल १७ सूचना असलेला एक मेसेज सोशल मिडीयावर फिरतो आहे. यामध्ये कोरोनाच्या बाबतीत चुकीची माहिती देण्यात आलेली आहे.

औरंगाबाद: ‘जिल्हाधिकारी यांच्याकडून सूचना’ असा मॅसेज गुरुवार (ता.२) रोजी सोशल मिडीयात चांगलाच व्हायरल झाला. यातील अनेक मॅसेज नागरीकांनामध्ये भीती निर्माण करणे, दिशाभुल करणारे असल्याने सोशल मिडीयावर फिरणारा हा मेसेज फेक असल्याची माहिती जिल्हा माहिती अधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली.

अशा प्रकारच्या सूचना जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या नाहीत. तसेच अशा प्रकारचे वृत्त जिल्हा माहिती कार्यालयाने काढलेले नाहीत. हा मेसेज फेक असल्याने त्याला कुणी ही शेअर करु नये असे संदेश माहिती अधिकारी कार्यालयाकडून देण्यात आले.

हेही वाचा- औरंगाबादच्या संसर्गातील चाप लागेना

‘औरंगाबादच्या कलेक्टरकडून सूचना’ अशा तब्बल १७ सूचना असलेला एक मेसेज सोशल मिडीयावर फिरतो आहे. यामध्ये कोरोनाच्या बाबतीत चुकीची माहिती देण्यात आलेली आहे. यामध्ये सगळ्यांनी आता अतिदक्षता पाळायची आहे. चिकन, मटन बंद, शेजारी पाजारी बंद, कुणासोबत फिरणे बंद, सर्वांनी गरम पाणी वापरणे, ब्रेडपाव बेकरी बंद, सामान बंद, बाहेरील व्यक्ती घरामध्ये कोणत्याही परिस्थितीत कामासाठी घेऊ नये असे अनेक चुकीचे मॅसेज यामध्ये देण्यात आलेले आहे.

दुधाची पिशव्या, पोस्टाची पत्रे, मोलकरणी यांच्या बाबत चुकीची माहिती देण्यात आलेली आहे. पुढील पंधरा दिवसांसाठी सामान, ज्यांना सुट्टी घेणे शक्य आहे त्यांनी घ्यावी. ऑनलाईन फुड यांचीही माहिती देण्यात आलेली आहे. यामध्ये १७ प्रकारच्या सूचना लिहल्यानंतर खाली जिल्हा माहिती अधिकारी कार्यालय असे लिहले आहे. मात्र हा मेसेज फेक असल्याची माहिती जिल्हा माहिती अधिकारी कार्यायाने दिलेली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Social Media Fake Message Aurangabad News