पोटच्या गोळ्यानेच घोटला आईचा गळा, नागरिकांनी पोलिस येईपर्यंत आरोपी मुलाला ठेवले बांधून

सुषेन जाधव
Wednesday, 2 September 2020

बाळापूर (ता. औरंगाबाद) येथील एका युवकाने आपल्या आईच्या डोक्यात कुऱ्हाड घालून तिचा खून केल्याची घटना बुधवारी (ता.२) रात्री साडेसात वाजता घडली. रमेश भिकाजी घुगे (वय ३० वर्षे) असे त्या संशयित आरोपी मुलाचे नाव असून त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. शशिकलाबाई भिकाजी घुगे (वय ७५ वर्षे) असे मयत आईचे नाव आहे.
 

औरंगाबाद: बाळापूर (ता. औरंगाबाद) येथील एका युवकाने आपल्या आईच्या डोक्यात कुऱ्हाड घालून तिचा खून केल्याची घटना बुधवारी (ता.२) रात्री साडेसात वाजता घडली. रमेश भिकाजी घुगे (वय ३० वर्षे) असे त्या संशयित आरोपी मुलाचे नाव असून त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. शशिकलाबाई भिकाजी घुगे (वय ७५ वर्षे) असे मयत आईचे नाव आहे.

हेही वाचा-BreakingNews: मशीद उघडण्याआधीच इम्तियाज जलील पोलिसांच्या ताब्यात 

सदर घटना समजताच परिसरातील नागरिकांनी आरोपी रमेश याला दोरीने बांधून ठेवले, तसेच चिकलठाणा पोलिसांना कळविले. दरम्यान पोलिस उपअधीक्षक डॉ. विशाल नेहूल, सहायक पोलिस निरीक्षण महेश आंधळे, श्री. शिंदे, जमादार श्री. लूटे, डकले यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. तसेच पंचनामा केला.

महेश आंधळे यांनी दिलेल्या माहितीनुसार घटनेतील संशयित आरोपी मुलाला ताब्यात घेण्यात आले असून तो मनोरुग्ण असल्याची प्राथमिक माहिती आहे. आरोपी रमेश याच्यावर बाऱ्हाळे रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्याने आईचा खून का केला हे मात्र अद्याप कळले नसल्याचे त्यांनी सांगितले. मयत आई शशिकला यांना घाटीत दाखल करण्यात आले असून सकाळी त्याचे शवविच्छेदन करण्यात येणार असल्याचेही श्री. आंधळे यांनी सांगितले.

लॉन्ड्रीचालकाने घेतली एक हजाराची लाच

औरंगाबाद/जालना: चारित्र्य प्रमाणपत्र काढून देण्यासाठी भाजीपाला विक्री करणाऱ्या व्यक्तीकडून एक हजार रुपयांची लाच घेणाऱ्या लॉन्ड्रीचालकाला जालना लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) बुधवारी (ता.२) पकडले. एसीबी जालनाचे पोलिस निरीक्षक एस. एस. ताठे यांनी सापळा लावून ही कारवाई केली.

प्रितम अशोक मढीकर (३०, रा.सिडको एन-७) असे त्या लॉन्ड्रीचालक आरोपीचे नाव आहे. तक्रारदाराने चारित्र्य प्रमाणपत्रासाठी ऑनलाईन अर्ज केला होता, सदर प्रमाणपत्र काढून देण्यासाठी प्रितम याने २९ ऑगष्ट रोजी पैशांची मागणी केली होती. तडजोडीअंती एक हजार रुपये देण्याचे ठरले. बुधवारी (ता.२) एसीबीने लाच घेताना प्रितम याला पकडले. त्याच्याकडून लाचेची रक्कम जप्त करण्यात आली आहे.

 
संपादनः सुषेन जाधव

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Son Murderd His Mother Aurangabad News