esakal | शाळा अद्याप बंदच... दहावीच्या परीक्षेचा फॉर्म भरायचा कसा? 
sakal

बोलून बातमी शोधा

ssc exam

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावीचे ऑनलाईन परीक्षा अर्ज भरण्याच्या तारखा जाहीर केल्या आहेत.

शाळा अद्याप बंदच... दहावीच्या परीक्षेचा फॉर्म भरायचा कसा? 

sakal_logo
By
संदीप लांडगे

औरंगाबाद: मार्च महिन्यात होणाऱ्या दहावीच्या परीक्षेचे ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया २३ डिसेंबरपासून सुरू झाली आहे. मात्र कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे औरंगाबाद आणि परिसरातील शाळा बंदच असल्याने परीक्षा अर्ज भरायचा कसा? असा प्रश्न शाळांना पडला आहे. शाळा, संस्थांकडून याविषयी नाराजी व्यक्त केली आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावीचे ऑनलाईन परीक्षा अर्ज भरण्याच्या तारखा जाहीर केल्या आहेत. २३ डिसेंबर ते ११ जानेवारी २०२१ या कालावधीत नियमित विद्यार्थ्यांचे परीक्षा अर्ज भरुन घ्यायचे आहेत. १२ ते २५ जानेवारी या कालावधीत पुनर्परीक्षार्थी, श्रेणीसुधार योजनेतील, तुरळक विषय घेऊन परीक्षेस बसलेले विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी अर्ज करता येणार आहे. 

शेतकऱ्याचा माल थेट ग्राहकांच्या दारी; भाजीपाल्याची घरोघरी विक्री

विद्यार्थ्यांना www.mahahsscboard.in या वेबसाईटवर अर्ज भरायचा आहे. परीक्षेसाठी अर्ज शाळेतूनच भरावा, अशा सूचना शिक्षण मंडळाने दिल्या आहेत. परंतू, कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शहरासह जिल्ह्यातील अनेक शाळा अद्यापही बंदच आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे परीक्षा अर्ज कसे आणि कधी भरून घ्यावेत, असा प्रश्न शाळा, संस्थांना पडला आहे. 

विद्यार्थी ग्रामीण भागातूनच घेतात ऑनलाईन प्रशिक्षण 
औरंगाबाद शहरी भागात अजूनही शाळा वा दहावीचे वर्ग ऑनलाइन सुरू आहेत. शाळा प्रत्यक्षात सुरू करण्यासाठी शिक्षण विभागाकडून 4 जानेवारीची तारीख निश्‍चित केली आहे. मात्र, लगेच शाळेत शंभर टक्के विद्यार्थी उपस्थित राहातील याबाबत संभ्रमावस्था आहे, अशा परिस्थितीत अर्ज कसे भरायचे? याविषयी शिक्षण मंडळाने कोणत्याही सूचना दिल्या नसल्याचे शाळांचे म्हणणे आहे.

कौतुकास्पद! सौर ऊर्जेतून औरंगाबाद जिल्ह्यातील शाळा बनली स्वयंपूर्ण

दहावीचे बरेचसे विद्यार्थी सध्या गावाकडे गेलले असून ऑनलाईनच्या माध्यमातून ते क्लासमध्ये सहभागी होतात. अशावेळी घाईघाईने ही प्रक्रिया सुरू करणे अन्यायकारक होईल. अर्ज भरताना फोटो, आधारकार्ड तसेच विद्यार्थी स्वाक्षरी लागते, तसेच परीक्षेचे शुल्कही भरावे लागते. मुळात परीक्षा प्रवेश अर्ज ऑनलाइन भरले जात असल्याने व तत्काळ हॉलतिकीट जनरेट होत असल्याने जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात ही प्रक्रिया सुरू करायला हवी होती, असे जिल्हा माध्यमिक शाळा शिक्षकेत्तर संघटनेचे राज्याध्यक्ष वाल्मिक सुरासे यांनी सांगितले.