एसटीने माल पाठवा अन् निर्धास्त राहा 

photo
photo

औरंगाबाद ः कोरोनामुळे एसटी प्रवासी वाहतुकीवर विपरीत परिणाम झाला आहे. त्यामुळेच महामंडळातर्फे मालवाहतुकीला सुरवात केली आहे. गेल्या महिनाभरात भरभरून प्रतिसाद मिळत आहे. भविष्यात प्रवासी वाहतुकीच्या बरोबरीने मालवाहतुकीला स्थान द्यावे लागणार आहे. असे झाले तरच एसटीला सावरण्यास मदत होणार आहे. 
एसटी महामंडळाने २७ मे रोजी माल वाहतूक सुरु करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी मुदत संपलेल्या जुन्या बसचे रूपांतर मालवाहतूक ट्रकमध्ये केले जात आहे. औरंगाबाद विभागाने दहा मालवाहतूक ट्रक तयार केल्या आहेत. ही मालवाहतूक सुरु झाल्यापासून तब्बल ८६ फेऱ्या राज्यातील विविध शहरांमध्ये केल्या आहेत. यातून महामंडळाला ४ लाख ६८ हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. मालवाहतुकीला भरभरून प्रतिसाद मिळत असल्यानेच आणखी दहा ट्रकची निर्मितीचे काम मध्यवर्ती कार्यशाळेत सुरु करण्यात आले आहे. 

दोन हजार कोटीचे नुकसान

कोरोना विषाणूमुळे राज्यातील एसटी बससेवा पहिल्यांदाच दोन महिने बंद राहिली. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात रेडझोन वगळता जिल्ह्याअंतर्गत बससेवा सुरू झाली आहे. मात्र प्रवाशांच्या कमतरतेमुळे प्रचंड तोटा सोसावा लागत आहे. प्रवाशांच्या कमतरतेमुळे बस रिकाम्या धावत आहेत. परिणामी आगाराचा इंधनाचा खर्चही निघत नाही. कोरोनाच्या संकटात दररोज एसटीचा राज्याचा तोटा २१ कोटी होता. तर लॉकडाऊनच्या काळात दोन हजर कोटी पेक्षा अधिक नुकसान झाले आहे. हे नुकसान अजुनही सुरुच आहे. एकुणच परिस्थितीचा विपरीत परिणाम झाल्याने एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनाचाही प्रश्न निर्माण झाला आहे. राज्य शासनाकडे विविध योजनांच्या प्रतिपुर्तीपोटीच्या थकबाकीची जवळपास ६७० कोटी रुपये शासनाने एसटीला दिले आहेत. त्यामुळे एप्रिल, मे जून अशा तीन महिन्याचे वेतन कर्मचाऱ्यांना मिळाले आहे. 

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

मालवाहतुकीला बळ देण्याचा प्रयत्न

प्रवासी वाहतुकीत सध्या होत असलेला तोटा कमी करण्यासाठीच मालवाहतूक सुरु केली आहे. त्यानुसार राज्यातील प्रत्येक आगारात अशा बस तयार करण्यात आल्या आहेत. प्रत्येक आगारातून राज्याच्या कान्याकोपऱ्यात मालवाहतूक करण्यात येत आहे. एसटीची मालवाहतुकीची ही सेवा घेण्यासाठी विविध कंपन्या, ट्र्न्सपोर्ट व्यावसायीक, शेतकरी अशा सर्वांनाच नजीकच्या एसटी आगाराशी संपर्क करून आपला माल व वस्‍तू नेता येणार आहे. अगदी शहरापासून ते खेड्यापाड्यांपर्यंत पोचलेल्या लालपरीने आता मालवाहतुकीचा विडा उचलला आहे. प्रवासी वाहतुकीतून मिळवलेला विश्वास असल्यानेच या नव्या सेवेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. 

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

महाराष्ट्रातील इतर बातम्या बाचण्यासाठी क्लिक करा

सुरक्षित आणि विश्वासपात्र

माफत दरात मालवाहतुकीची तात्काळ सुविधा, सुरक्षित वाहतूक, महाराष्ट्रात कुठेही वेळेवर वितरण अशी सेवा दिल्या जात आहे. फळे, भाजीपाला, धान्य, यंत्रसामग्री, बांधकाम साहित्य, कच्चा माल, तयार उत्पादने, फर्निचर, किराणा व खाद्यपदार्थ, शेतीउद्योगाचे साहित्य, बी-बियाणे, अवजारे तसेच विविध कंपन्यांमध्ये तयार होणाऱ्या मालाची सुरक्षित वाहतूक करण्यात येत आहे. एसटीचा ट्रक हा बंद बॉडीचा असल्याने माल पावसाने भिजण्याची चिंता राहिली नाही त्यामुळेच एसटीने माल पाठवा आणि बिनधास्त राहा अशी नवी टॅगलाईन एसटीने स्वीकारली आहे. 

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com