चवीपुरतं : पण काय ते वाचा 

photo
photo

चवीपुरतं : गोपाळराव आणि आनंदीबाई दामले हे जोडपे नोकरी निमित्त भारत देशाच्या विविध भागात वास्तव्यास असतात. तेव्हा आनंदीबाई त्या त्या ठिकाणची खानपान संस्कृती, पदार्थ इत्यादीचा अभ्यास करतात. ब्राह्मण असूनही मद्य मांसही खातात कारण त्या त्या ठिकाणच्या परिस्थितीप्रमाणे त्यांना राहावे लागते. ही गोष्ट ब्रिटिशकाळातील म्हणजे इ. स. 1940-45 च्या सुमाराची आहे. आपल्या या सर्व अनुभवातून आनंदीबाई पाकशास्त्र विविध शाकाहारी, सामीष खाद्यपदार्थ यावर ग्रंथही लिहितात. ही एकअर्थी एक प्रकारची सनातनी वातावरणविरुद्धची बंडखोरीच असते. 

अनिष्ठ परंपरेचा विरोध 

नाटकाचे कथानक हे अशा प्रकारे पाक कलेशी संबंधित असल्याने त्याचे नाव चवीपुरतं असं ठेवलय. नावावरून आणि आरंभीच्या काही मिनिटांची पती पत्नीची थट्टा मस्करी यावरून हे एक हलक्‍या फुलक्‍या जातकुळीचं नाटक असावं असं आपल्याला वाटतं. नंतर पाककलेवरचा फोकस पाहाता हे स्वयंपाक केंद्रित नाटक असावं असा समज होतो. परंतु जसजसे नाटक पुढे सरकते. तससते आशयाचे गांभीर्य, महत्त्व लक्षात येवू लागते. हे नाटक पाककलेचे वा स्वयंपाकघराचे व खाद्यसंस्कृतीचे नाही तर सर्वस्तरातील जुन्या बोजड परंपरा, पीढीजात समज, कालबाह्य झालेले कर्मकांड, अंधश्रद्धा, जाचक चलीरिती, संकल्पना, जातीपातींची दिवसेंदिवस दृढ होत जाणारी कुंपणे, स्वतःच्याच जातीला सोयीसवलती, संरक्षण, प्राधान्य मिळावे यासाठी चाललेली झुंडशाही, इत्यादींना मुठमाती देवून नव्या जागतिकीकरणाच्या दिशेने चाललेल्या वाटचालीचा स्वीकार, ग्लोबल, सिटीझनशीपची संकल्पना, मानवतावाद यांचा स्वीकार करणेच इष्ट आहे असा संदेश देणारे हे नाटक आहे. 

आगळी वेगळी मांडणी 

या संदेशाचे सर्व थरात तात्काळ स्वागत होईल असे नाही. उलट परंपरावाद्यांचा त्याला विरोध पूर्वीही होता नेहमीच राहील. परंतु संगणकयुगात जन्मलेली आणि जागतिक व्हीजन असलेली नवी उद्यमी विवेकी पिढी अनिष्ट ते झुगारणारच हेही लेखक अधोरेखित करतो. सध्याच्या काळातील नाटकांच्या सामाजिक, विनोदी, गुढ वा राजकीय सवंग विषयांच्या लाटेवर स्वार न होता या एका आगळ्यावेगळ्या विषयाची, दृष्टीकोनाची मांडणी चवीपुरतं हे नाटक करते. 

मुंबईचे कलाकार 

लेखक. भालचंद्र कुबल, दिग्दर्शक : ज्ञानदेव दौंड, नेपथ्य - भालचंद्र कुबल, प्रकाश योजना- विनोद राठोड संगीत : अक्षय जाधव, रंगभुषा - दत्ता भाटकर, वेशभुषा : वैशंपायन गमरे, केशभुषा : निकिमा गायकवाड कलाकार : नम्रता काळसेकर, प्रितेश मांजलकर, सुनील जाधव आणि मृदुला अय्यर आदी. सादरकर्ते : सहप्रमुख कामगार अधिकारी हरीष जामठे, बृहन्मुंबई महानगरपालिका. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com