ह्येच्या आईचा वग : तमासगिरांची शोकांतिका 

photo
photo

औरंगाबाद : अनेक मराठी चित्रपटांमुळे तमाशा किंवा लोकनाट्य, लावणी या कलाप्रकाराची लोकप्रियता वाढलेली आहे. त्याला एक वलय (ग्लॅमर) प्राप्त झालेले आहे. प्रामुख्याने जनसामान्यांचा करमणुकीसाठी वापरला जाणारा तमाशा, तमासगीर कलावंत, शाहीर, डान्सर्स, गावोगावी यात्रा-जत्रा, उरुसातून कार्यक्रम करणारे तमाशा फड यांची एक समृद्ध परंपरा मराठी साहित्य आणि कलाक्षेत्रास लाभलेली आहे. एक काळ तर असा होता की, मराठी चित्रपट म्हणजे तमाशापट अशीच अमराठी प्रेक्षकांची समजूत झालेली होती. 

सुरेख मांडणी

इतका तमाशाचा पगडा सिनेमा व्यवसायावरही होता. केवळ गरीब, अल्पशिक्षित घरातील मुलीच नव्हे, तर शहरी उच्चशिक्षित, उच्चवर्णीय तरुणीही लावणी डान्स शिकण्यात अभिमान मानू लागल्या. सिनेमाप्रमाणेच, टीव्ही मालिका, टीव्ही कार्यक्रम यांनीही तमाशाच्या भांडवलावर आपली लोकप्रियता वाढविली. आधुनिक तमाशा फडांचे कार्यक्रम राज्यातील आणि परदेशातीलही प्रतिष्ठित महागड्या नाट्यगृहांतून हाऊसफुल्ल गर्दी खेचू लागले. तमाशाच्या या ग्लॅमरमागची, तमाशा कलावंतांच्या जिंदगीची खरीखुरी दशा मात्र विलक्षण विषण्ण करणारी आहे. असते. तमाशा फड मालकाची अरेरावी. गावोगावच्या गुंडापुंडांच्या हल्ल्याची भीती, वैद्यकीय सेवासुविधा, सुरक्षितता, निश्‍चित उत्पन्न, या कशा-कशाचीही शाश्‍वती नसणारे तमासगिरांचे खरेखुरे जीवन मात्र विलक्षण दु:खद असते. गरिबी, आर्थिक हलाखी तर पाचवीलाच पुजलेली असते. हे सगळे ‘ह्येच्या आईचा वग’ या नाटकात फार सुरेख मांडले आहे. 

सुरेख मांडणी

रंगमंचाच्या अर्ध्या भागात स्टेज उभारून तिथल्या झगमगाटात तमाशाचा खेळ, डान्स, गणगवळण, बतावणी, लावणी हे सगळे चालू आहे, तर उर्वरित अर्धा भाग म्हणे स्टेजमागचे खरेखुरे जग. तिथे छोट्या जागेत या कलावंतांचा खराखुरा संसार, संवाद, सुख-दु:खांची देवाणघेवाण, मेकअप, चहापाणी हे सगळे चालू आहे. या दोन जागांतील विरोधाभास एकाचवेळी एकाच स्टेजवर दिग्दर्शकाने मोठ्या खुबीने मांडला आहे. तमाशाचा रांगडेपणा, ग्राम्यविनोद, भडक भाषा, पोशाख, लावण्या, डान्सेस यांना मनापासून दाद देत प्रेक्षक तमासगिरांच्या दशेने व्यथित होतो. त्यामुळे एकाचवेळी करमणूक आणि कारुण्य एकाच कॅनव्हासवर चितारण्याचा सादरकर्त्यांचा प्रस्तुत प्रयोग यशस्वी होतो, असेच म्हटले पाहिजे. 

- लेखक : राहुल बेलापूरकर 
- दिग्दर्शक : संजय मोहिते 
- रंगभूषा : गणेश माने 
- वेशभूषा : राजश्री खटावकर 
- तमाशा संगीत - महेश सोनुने 
- कलावंत : सचिन वाडकर, मीनाक्षी पाटील, मोहन गोजारे, आदिती देशपांडे, जीवन पाटील, मधुरिमा जाधव, चिंतन पाटील, वेदा सोनुने, शुभम खोत, अंकुश तिवारी, गौरव पाटील, अनिकेत सोसणे, विनायक कुंभार. 
- सादरकर्ते : फिनिक्‍स क्रिएशन, कोल्हापूर. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com