क्रांती चौकातील शिवरायांच्या पुतळ्याच्या कामाला आचारसंहितेचा अडसर!  

माधव इतबारे
Thursday, 5 November 2020

 
क्ले मॉडेलसंदर्भात आयोजित बैठक ऐनवेळी रद्द 

औरंगाबाद : क्रांती चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे काम रखडले आहे. आता मराठवाडा पदवीधर मतदार संघाच्या निवडणूक आचारसंहितेमुळे काम लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. पुतळ्याच्या क्ले मॉडेल संदर्भातील बैठक आचारसंहितेमुळे अचानक पुढे ढकलण्यात आली आहे. 

 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

क्रांती चौकातील पुतळ्याची उंची वाढविण्याचे काम महापालिकेने हाती घेतले आहे. मात्र आर्थिक अडचणीमुळे हे काम तीन वर्षांपासून कासवगतीने सुरू आहे. पुतळ्याच्या कामाला गती द्यावी, यासाठी शिवप्रेमी वारंवार पाठपुरावा करत आहेत. दरम्यान गेल्या आठवड्यात शहरात आलेल्या पालकमंत्री सुभाष देसाई यांच्यासमोर पुतळ्याचे क्ले मॉडेल सादर करण्यात आले होते. कला संचालनालयाच्या परवानगीने पुतळ्याचे क्ले मॉडेल मंजूर करावे, अशी सूचना श्री. देसाई यांनी केली होती. 

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

त्यानुसार मंगळवारी (ता. तीन) सकाळी साडेदहा वाजता बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यासाठी मावळते महापौर नंदकुमार घोडेले, उपमहापौर राजेंद्र जंजाळ, सभापती जयश्री कुलकर्णी, सभागृहनेते विकास जैन, विरोधीपक्ष नेत्या सरिता बोर्डे यांच्यासह विनोद पाटील, अभिजित देशमुख आणि पृथ्वीराज पवार यांना निमंत्रित करण्यात आले होते. मात्र मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या आचारसंहितेमुळे प्रशासनाला बैठक रद्द करण्याचा निर्णय घेतला. 

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

(संपादन-प्रताप अवचार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: statue of Shivaji Maharaj Work stop again Aurangabad news