चिमुकल्यांना लागलाय गोष्टी ऐकण्याचा छंद; ‘मिस कॉल द्या, गोष्ट ऐका’ उपक्रमाला विद्यार्थ्यांचा मोठा प्रतिसाद

Listen Story
Listen Story

औरंगाबाद : जिल्हा परिषद शिक्षण विभाग व रूम टू रीड यांच्या संयुक्त विद्यमाने वाचन मोहीम (#इंडियागेटसरिडींग) राबवण्यात येत आहे. २७ नोव्हेंबरपर्यंत चालणाऱ्या या उपक्रमाचे उद्‍घाटन मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मंगेश गोंदावले यांच्याहस्ते करण्यात आले. या उपक्रमाअंतर्गत सर्व विद्यार्थ्यांना एका मिसकॉलवर गोष्ट ऐकण्याचा आनंद लुटता येणार आहे.


कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता सध्या शाळा बंद आहेत. त्यामुळे शिक्षणात खंड पडू नये, वाचनालयाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा भाषा विकास करणे, विद्यार्थ्यांना स्वावलंबी बनवून सजग नागरीक बनवणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. विद्यार्थी शिक्षणाच्या दर्जानुसार या ग्रंथालयात पुस्तके उपलब्ध केली आहेत. जिल्ह्यात २०१८-१९ वर्षात ३० व २०१९-२० मध्ये ७० अशा शंभर शाळांमध्ये रुम टू रिड या संस्थेअंतर्गत ग्रंथालये उपलब्ध करुन दिली आहेत.

२८ सप्टेंबरपासून जिल्ह्यात ‘इंडिया गेट रिडिंग’ हा उपक्रम सुरु करण्यात आला आहे. या उपक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांनी मोबाईलवरुन १८०० १०२ ८७८६ हा टॉलफ्री नंबर डायल केल्यानंतर गोष्ट ऐकण्याचा आनंद लुटता येत आहे. ‘रुम टू रीड’ ही आशिया व आफ्रिका खंडात विकसनशील राष्ट्रामध्ये समाजकार्य करणारी अंतरराष्ट्रीय संस्था आहे. ही संस्था २०११ पासून राज्यातील शाळांमध्ये वाचनालय उपक्रम राबवित आहे.


जिल्हा परीषद व रुम टू रिड यांच्यावतीने २७ नोव्हेंबरपर्यंत ‘इंडिया गेट रिडींग’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. मुलांना एका मिसकॉलवर विविध प्रेरणादायक गोष्टीचा आनंद लुटता येत आहे. विद्यार्थ्यांची वाचन क्षमता वाढावी, तसेच वाचनाची सवय लागावी, श्रवणक्षमता सुधारावी, यासाठी हा उपक्रम राबवला जात आहे. उपक्रमाला जिल्हाभरातून मोठा प्रतिसाद आहे.
-सूरजप्रसाद जयस्वाल, शिक्षणाधिकारी प्राथमिक विभाग


दररोज सारीका जैन मॅडम यांचा ऑनलाईन तास असतो. त्याआगोदर मॅडम आम्हाला १५ ते २० मिनिट वाचन मोहिमेतील गोष्ट ऐकवतात. वाचन मोहिमेअंतर्गत आम्ही आत्तापर्यंत बूट व शूज, जादुचा दगड, तलावातील तारे, वाच हल्ला झाला अशा छान गोष्टी मिसकॉल देवून ऐकल्या.
-गौरव संभेराव, विद्यार्थी, जि. प. शाळा, लाडसावंगी

Edited - Ganesh Pitekar

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com