कापूस खरेदी केंद्रासाठी स्वाभिमानीचा औरंगाबादेत आक्रोश

मधुकर कांबळे
Wednesday, 28 October 2020

कृषी कार्यालयावर कापूस फेकून केला निषेध

औरंगाबाद : मराठवाड्यातील प्रत्येक तालूक्यात कापूस उत्पादक शेतकर्यांच्या कापसाची शासकीय हमीभावाने कापूस खरेदी करण्यासाठी तत्काळ कापूस खरेदी केंद्र सुरु करा, या मागणीसाठी औरंगाबाद कृषी कार्यालयासमोर आंदोलन केले. आंदोलन प्रसंगी पोलिसांनी अडवणूक केल्याने शेतकरी संघटनेचे पदाधिकारी संतापले आणि त्यांनी सोबत आणलेल्या कापूस कार्यालयावर फेकून मारला. 

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

मराठवाडा हा कापूस उत्पादनात अग्रेसर असल्याने यावर्षी देखील मराठवाड्यातील शेतकर्याने मोठ्या प्रमाणात कापसाची लागवड केली. परंतु सणासुदीचे दिवस असल्याने आपल्या आर्थिक गरजा पुर्ण करण्यासाठी शेतकर्यांना खुल्या बाजारात खाजगी व्यापार्यांकडे 30-35 रुपये किलोने विक्री करावी लागत आहे. तरी शासकीय हमीभावाने कापसाची खरेदी झाल्यास शेतकर्यांची खासगी व्यापार्यांकडून होणारी लूट थांबणार आहे. त्यामुळे आपल्या कृषी कार्यालयाच्या वतीने मराठवाड्यातील प्रत्येक तालुक्यातील शेतकर्यांसाठी कापूस खरेदी केंद्र सुरु करा, अशी मागणी करण्यात आली आहे. 

 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

लवकरात लवकर ही कारवाई पुर्ण करा, अशी मागणी करीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने क्रांती चोकाजवळ असलेल्या कृषी कार्यालयावर मोर्चा नेण्यात आला. यावेळी संतापलेल्या शेतकरी बांधवांनी व स्वाभिमानी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कापूस फेकून निषेध व्यक्त केला.

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.  

प्रशासनाने झोपेचे सोंग 
शासनाच्या वतीने त्वरीत कापूस खरेदी केंद्र सुरु करावी, अन्यथा स्वाभिमानी संघटना गप्प बसणार नाही, असा इशाराही स्वाभिमानीच्या पुजा मोरे, गजानन बंगाळे पाटील यांनी दिला आहे. 

(संपादन-प्रताप अवचार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Swabhimanis agitation for cotton shopping center Aurangabad news