मरकजला गेलेल्यांनी तपासणीसाठी स्वतःहून पुढे यावे : अन्यथा कडक कारवाई 

मरकजला गेलेल्यांनी तपासणीसाठी स्वतःहून पुढे यावे : अन्यथा कडक कारवाई 


औरंगाबाद : दिल्ली येथील निजामुद्दीन मरकज येथे जाऊन आलेल्या नागरिकांनी कोणतीही भीती न बाळगता स्वतःहून पुढे यावे आणि आपली आरोग्य तपासणी करावी अन्यथा त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येइल, असा इशारा जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी दिला आहे. 

दिल्ली येथून आल्यानंतर काही नागरिक जिल्ह्यात थांबले असतील तर त्यांनी स्वतःहून ०२४०-२३३१०७७ या हेल्पलाईनवर संपर्क साधून आपली तपासणी करावी अन्यथा त्यांच्यावर कडक कारवाई करणार असल्याचेही जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी सांगितले. 

हेही वाचा- धक्कादायक घाटीतील ब्रदरला कोरोनाची लागण

या अगोदरच तबलिगी जमाततर्फे पोलिस प्रसासनाला सदस्यांची नावे देऊन त्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे. या शिवाय तबलिग जमात यांच्याकडून सुद्धा तपासणीचे आवाहन करण्यात आले होते.

यानंतर सर्वांनी तपासणी केली. मात्र अजून ही कुणी तपासणीचे राहिले असतील तर त्यांनी स्वतःहुन पुढे यावे तसेच तपासणी करावी असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. त्यासाठी त्यांनी हेल्पलाईन नंतर सुद्धा दिला आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com