कोरोनाच्या उपचारासाठी मराठवाड्याला दहा कोटी रुपये, डीपीडीसीतूनही पाच टक्के

Aurangabad News
Aurangabad News

औरंगाबाद : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व रुग्णांच्या उपचार व अनुषंगिक बाबींसाठी विभागास एकूण दहा कोटी रुपये प्राप्त झाले आहेत. या निधीतून पाच कोटी रुपये मराठवाड्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना वितरित करण्यात आलेले असून, उर्वरित निधी आवश्यकतेनुसार संबंधित जिल्ह्यांना वितरित करण्यात येणार आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त कार्यालयाने प्रसिद्धिपत्रकाद्वारे दिली. 

प्रत्येक जिल्ह्यातील डीपीडीसी निधीतून पाच टक्के निधी या कामासाठी राखीव ठेवण्यात आलेला असून, तो आवश्‍यकतेनुसार वापरण्याबाबत सर्व जिल्हाधिकाऱ्यांना निर्देशही विभागीय आयुक्त कार्यालयातर्फे देण्यात आले आहे. 

मराठवाड्यातील ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपजिल्हा रुग्णालय, जिल्हा रुग्णालय, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे रुग्णालय; तसेच शासकीय रुग्णालयातील एकूण खाटांची संख्या ४,५९५ एवढी आहे. 

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

महाराष्ट्रातील इतर बातम्या बाचण्यासाठी - क्लिक करा

त्यापैकी उपजिल्हा रुग्णालय, जिल्हा रुग्णालय, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे रुग्णालय, शासकीय रुग्णालयात एक हजार ९२ खाटा रुग्णांसाठी आरक्षित करण्यात आलेल्या आहेत. तसेच विभागातील खासगी रुग्णालयात एकूण सहा हजार ६१६ खाटा असून, त्यापैकी ७१६ खाटा आवश्यकतेनुसार राखीव ठेवण्यात आल्या आहेत. 

विभागात ८४ ठिकाणी शिवभोजन केंद्र 

मराठवाड्यात एकूण ८४ ठिकाणी शिवभोजन केंद्र सुरू करण्यात आले आहे. त्यातून दहा हजार सातशेच्या आसपास रोज थाळी पार्सल बनवून देण्यात येत आहेत. जिल्ह्यात स्वस्त धान्य दुकानासाठी १,४५,६१७.४९ क्विंटल धान्य एफडीआयच्या गोदामातून उचल करण्यात आली आहे.

त्यापैकी ४६,२०५,४९ क्विंटल धान्य यांची उचल स्वस्त धान्य दुकानदाराकडून करण्यात आलेली आहे. लाभार्थींना एकूण २९,२३१,३५ क्विंटल धान्य वाटप करण्यात आले असल्याची माहितीही विभागीय आयुक्त कार्यालयातर्फे देण्यात आली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com