Corona कोरोनामुक्तांनी व्यक्त केली काय भावना.... वाचा  

औरंगाबाद : कोरोनामुक्तांनी कोरोनायोद्ध्यांचे आभार मानत महापालिका आयुक्तांसोबत सेल्फी घेतला.
औरंगाबाद : कोरोनामुक्तांनी कोरोनायोद्ध्यांचे आभार मानत महापालिका आयुक्तांसोबत सेल्फी घेतला.

औरंगाबादः कोरोना झाल्याचे समजल्यावर घरातील सर्व सदस्य घाबरून गेले. आमच्याही मनात धाकधूक होती. संकट मोठे होते; पण आम्ही कोरोनामुक्त होऊ हा आत्मविश्‍वास होता. डॉक्टरांनी घेतलेल्या काळजीमुळेच आम्ही बरे झालो. महापालिका आयुक्त आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांचे आम्ही खूप आभारी आहोत... या प्रतिक्रिया व्यक्त केल्या रविवारी (ता.१२) कोरोनामुक्त झालेल्या लोकांनी. त्यांनी कोरोना योद्ध्यांच्या परिश्रमाचे कौतुक केले. 

देवगिरी महाविद्यालयाच्या मुलांच्या वसतिगृहात कोविड केअर सेंटरमध्ये उपचार घेणाऱ्या ८४ जणांना रविवारी (ता.१२) डिस्चार्ज देण्यात आला. महापालिका आयुक्त आस्तिककुमार पांडेय, आमदार सतीश चव्हाण, महापालिकेच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर उपस्थित होते. सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून कोरोनामुक्त झालेल्यांचा सत्कार करून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. यातील काही जणांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले. ‘कोरोना झाल्याचे समजल्यावर घरातील सर्वच सदस्य चिंतेत होते. आता कसे उपचार होतील अशी चिंता सर्वांनाच होती.

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

महापालिकेच्या आरोग्य पथकाने देवगिरी महाविद्यालयाच्या मुलांच्या वसतिगृहात उपचारासाठी आणले. पहिल्या दिवसापासूनच येथे घरच्यासारखे वातावरण बघावयास मिळाले. डॉक्टरांसह, कर्मचाऱ्यांनी काळजी घेतल्याने कोरोनामुक्त झालोय. संकट मोठे असले तरीही सर्वांनी आत्मविश्‍वास ठेवायला हवा. येथील सुविधा, जेवण, स्वच्छता, कर्मचाऱ्यांकडून मिळणाऱ्या वागणुकीबद्दल कोरोनामुक्त झालेल्यांनी प्रशंसा केली. 

चिमुकल्यासह आईला सुटी 

डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णांमध्ये दोन महिन्यांच्या बाळासह त्याच्या आईचा देखील समावेश होता. याप्रसंगी उपस्थित राहून कोरोनामुक्त झालेल्यांचे टाळ्या वाजवून स्वागत करण्यात आले. दरम्यान, आयुक्त पांडेय यांनी वैद्यकीय अधिकारी डॉ. पाडळकर यांच्याबरोबरच डॉक्टर, कर्मचाऱ्यांच्या कामाचे कौतुक केले.

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

कोरोनामुक्त झालेल्या एका रुग्णाने डॉक्टरांच्या तत्परतेबद्दल आभार मानले. उपचार घेताना सातव्या दिवशी रात्री अचानक त्याला त्रास जाणवू लागला. डॉक्टरांना बोलवून घेतले. अर्ध्या रात्री देखील डॉक्टरांनी तपासणी केली आणि धीर दिला. दिवसरात्र न पाहता डॉक्टर्स आणि कर्मचाऱ्यांनी केलेल्या कामाचे कौतुक करून सर्वांचे आभार मानले. 

महाराष्ट्रातील इतर बातम्या बाचण्यासाठी - क्लिक करा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com