मराठवाडा पदवीधर निवडणुकीत मतपत्रिकांची फेरफार, मुंडे यांची निवडणूक आयोगाकडे तक्रार

प्रकाश बनकर
Saturday, 19 December 2020

मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत मतपत्रिकेची फेरफार करण्यात आली,असून यात अनेक मतपत्रिका कोऱ्या निघाल्या.

औरंगाबाद : मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत मतपत्रिकेची फेरफार करण्यात आली,असून यात अनेक मतपत्रिका कोऱ्या निघाल्या. तर मतदान केंद्रानिहायमोजणी न करता सर्व एकत्रित करण्यात आली. यासह अनेक पत्रिकांवर मतदानकेंद्र प्रमुखाच्या स्वाक्षरीत तफावत दिसून आली असल्याचा आरोप अपक्ष उमेदवार सिध्देश्‍वर मुंडे यांनी शुक्रवारी (ता.१८) पत्रकार परिषदेत केला. या विषयी राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार केली असून या विषयी उच्च न्यायालयात जाणार असल्याचेही मुंडे म्हणाले.

 

 

मुंडे म्हणाले, मतदान केंद्रावर जेवढे मतदान प्रत्यक्ष झाले. तेवढ्याच मतपत्रिका मतमोजणी केंद्रनिहाय निघायला पाहिजेत. यात प्रत्यक्ष मतदान आणि झालेल्या मतदानात तफावत दिसून आली. यात मतपत्रिका जास्तीच्या दिसून आल्या. अशा १८६ मतपत्रिका जास्तीच्या आल्या. मतदान केंद्रप्रमुखाच्या स्वाक्षरीतही तफावत दिसली. याविषयी मतमोजणीच्या दिवशीच तक्रार देण्यात आली होती. मात्र योग्य उत्तर निवडणूक अधिकाऱ्यांनी दिले नाही. यात ५ ते ६ हजार मतपत्रिका कोऱ्या निघाल्या. विजयी उमेदवाराच्या समोर १ हा अंक एकाच व्यक्तीने घाईत नोंदवल्यासारखे दिसत होते. यामुळे यांची चौकशी करावीत अशी मागणीही यावेळी करण्यात आली.

 

Edited - Ganesh Pitekar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: There Is Mishandling In Graduate Election Aurangabad News