esakal | दिलासादायक : औरंगाबादवरुन ३ हजारावर परप्रांतीय मजुरांना घेऊन आज दोन रेल्वे धावणार
sakal

बोलून बातमी शोधा

Lebour

उत्तरप्रदेश, झारखंड, बिहारमधील स्थलांतरीत मजुर कामगारांना रेल्वेच्या माध्यमातुन त्याच्या मुळ गावी सोडण्यात येत आहे. प्रत्येक रेल्वेत सोळाशे मजुरांचा समावेश असेल. नोंदणीकृत नागरिकांनाच रेल्वेने प्रवास करणे शक्य असुन बुधवारी (ता.१३) दुपारी दोन वाजता उत्तरप्रदेशातील बलीया तर रात्री आठ वाजता उत्तरप्रदेशमधील गोरखपुरकडे रेल्वे सोडण्यात येत आहेत.

दिलासादायक : औरंगाबादवरुन ३ हजारावर परप्रांतीय मजुरांना घेऊन आज दोन रेल्वे धावणार

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

औरंगाबाद: उत्तरप्रदेश, झारखंड, बिहारमधील स्थलांतरीत मजुर कामगारांना रेल्वेच्या माध्यमातुन त्याच्या मुळ गावी सोडण्यात येत आहे. प्रत्येक रेल्वेत सोळाशे मजुरांचा समावेश असेल. नोंदणीकृत नागरिकांनाच रेल्वेने प्रवास करणे शक्य असुन बुधवारी (ता.१३) दुपारी दोन वाजता उत्तरप्रदेशातील बलीया तर रात्री आठ वाजता उत्तरप्रदेशमधील गोरखपुरकडे रेल्वे सोडण्यात येत आहेत.

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठीक्लिक करा

याबाबात माहिती देताना जिल्हाधिकारी कार्यालयाने सांगीतले, की गुरुवारी (ता.१४) दुपारी दोन वाजता उन्नाव व रात्री आठ वाजता आग्राकडे रेल्वे सोडण्यात येणार आहेत. मंगळवारी (ता.१२) पहिली रेल्वे जालना जिल्ह्यातुन धावली. प्रत्येक रेल्वेतुन सोळाशे असे चार गाड्यातुन सहा हजार चारशे मजुर आपल्या गावी पोहचतील. रेल्वेमध्येच त्यांच्या जेवनाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. तसेच मास्क, सॅनिटायझरही देण्यात येणार आहे. दरम्यान, उत्तरप्रदेशातील मजुर कामगारांसाठी सहा रेल्वे गाड्यांची मागणी असल्याचे सांगण्यात आले.

विशेष गाडीने गेले होते १२२४ मजूर
कोरोना व्हायरसच्या प्रादूर्भावामुळे लॉकडाऊन करण्यात आल्याने मराठवाड्यातील विविध भागात अडकून पडलेल्या मध्यप्रदेशातील १२२४ मजुरांना औरंगाबादत रेल्वेस्थानकावरुन विशेष गाडीने सात मे रोजी रवाना करण्यात आले होते. लॉकडाऊनच्या परिस्थितीमुळे औद्योगिक वसाहतीत विविध कारखान्यात काम करणाऱ्या परप्रांतीय मजूर, कामगारांना अडकून पडावे लागले होते

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा