मराठवाड्यातील पर्यटन; जाणून घ्या लातूर, नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यातील प्रसिध्द पर्यटनस्थळे

aundha nagnath
aundha nagnath

औरंगाबाद: मराठवाड्याचं पर्यटन या विषयांमध्ये मागील लेखात बीड, उस्मानाबाद आणि परभणी जिल्ह्यातील प्रसिध्द पर्यटनस्थळांबद्दल माहिती जाणून घेतली. या लेखात आज आपण मराठवाड्यातील अजून मह्त्त्वच्या तीन जिल्ह्यातील पर्यटनस्थळांबद्दल जाणून घेणार आहोत. यामध्ये लातूर, नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यातील स्थळांचा समावेश आहे.

लातूर जिल्ह्यातील पर्यटन-
लातूर जिल्ह्यात प्रमुख्याने किल्ले आणि खरोसा लेणी प्रसिद्ध आहेत. या तिन्ही ठिकाणी दरवर्षी लाखो पर्यंटक भेटी देतात. जिल्ह्यात उदगीर तालुक्यात मौजे हत्ती बेट नावाचं ठिकाण उदगीर शहराच्या पश्चिमेस १६ किलो मीटरवर वसले आहे. हत्ती बोटाला पुरातन काळापासून महत्त्व प्राप्त झालं आहे. या ठिकाणी पुरातन मंदिरांबरोबरच गुहा, कोरीव शिल्प मोठया प्रमाणात पाहावयास मिळतात. हत्ती बेट देवर्जनाला प्रादेशिक पर्यटनाचा दर्जा मिळाला आहे. मराठवाडा मुक्ती संग्राममध्ये रझाकारांविरुद्ध स्वातंत्र्यसैनिकांनी युद्ध करून शेवटपर्यंत हत्ती बेट रझाकारांना जिंकू दिलं नाही असा इतिहास सांगितला जातो.

यासह जिल्ह्यात खारोसा लेणी, लातूर जिल्ह्यात असलेल्या खारोसा नावाच्या खेड्यात आणि लातूर शहरापासून ४५ किलो मीटर अंतरावर ही लेणी आहे. गुप्ता कालावधी दरम्यान बांधलेल्या अर्चनाचा सहाव्या शतक आणि शिव पार्वती, रावण, कार्तिकय या शिल्पाकृतींसाठी सुप्रसिद्ध आहे. येथे १२ लेण्या आहेत. पहिली गुहा एक बुद्धी गुहेत आहे ज्यामध्ये भगवान बुद्ध यांच्या बसलेल्या स्थितीत बसलेली मूर्ती आहे. यासह जिल्ह्यात ऐतिहासिक औसाचा किल्ला आहेत. १२०० मध्ये विकसित केला गेल्‍याचा इतिहास आहे. अशाच प्रकारे बाराव्या शतकात उदगीर किल्ला याच जिल्ह्यात आहेत.

नांदेड जिल्ह्यातील पर्यटन
नांदेड जिल्हा धार्मिकस्थळ प्रसिद्ध आहेत. शीख समाजाचे देशातील महत्त्वाचे धार्मिक स्थळ असलेली तख्त सचखंड गुरुव्दारा शहरात आहेत. दरवर्षी लाखो भाविक इथे येतात. यासह हिंदू धर्मातील तीन शक्तीपीठापैकी माहूर गड रेणुका देवीचे मंदिरही याच जिल्ह्यात आहेत. नैसर्गिक सौंदर्यात डोंगरावर वसलेले आहे. देवगिरीच्या यादवाचा राजा यानी देवीचे मंदिर सुमारे आठशे ते नऊशे वर्षांपूर्वी बांधण्यात आले होते. दरवर्षी नवरात्र व दसऱ्याच्या दिवशी मोठा मेळावा भरतो.

यासह नांदेड जिल्ह्यात आणखी माळेगाव यात्रा प्रसिद्ध आहेत. नांदेडपासून ५७ किलोमीटरवर लोह तालुक्यात मालेगाव हे गाव आहे. भगवान खंडोबाच्या सन्मानार्थ अतिशय मोठ्या मेळाव्यासाठी प्रसिद्ध आहे. ही यात्रा डिसेंबर ते जानेवारी महिन्यात भरते. राज्यभरातून भाविक यात्रेस येतात.

हिंगोली जिल्ह्यातील पर्यटनस्थळे
मराठवाड्यातील या जिल्ह्यात बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेले औंढा नागनाथचे मंदिर आहेत. हे आठवे ज्योतिर्लिंग(आद्या) आहेत. यामुळे येथे दरवर्षी लाखो भाविक भेट देतात. नागनाथ मंदिर हे हेमाडपंती वास्तुशिल्प आहे. यासह जिल्ह्यातील नरसी हे गावात संत नामदेव यांचा जन्मस्थळ आहे. सरकारने नरसी येथील पर्यटनस्थळ बांधले आहे. पंजाब आणि उर्वरित भारतातील संत नामदेव यांचे अनुयायी नरसीला भेट देतात.यासह जिल्ह्यातील औंढा नागनाथ तालुक्यातील शिरद शहापूर गावात जैन समाजातील सर्वात ऐतिहासिक मल्लिनाथ दिगंबर जैन मंदिर आहे. या मंदिराच्या स्थापनेची कल्पित कथा आहे.

(edited by- pramod sarawale)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com