घरोघरी दिवे लावत कोपर्डीतील पीडितेला  वाहीली श्रद्धांजली 

 Tribute to the victim of Kopardi by lighting lamps in the house  Aurangabad News
Tribute to the victim of Kopardi by lighting lamps in the house Aurangabad News

औरंगाबाद : कोपर्डीतील घटनेला सोमवारी (ता.१३) चार वर्ष पूर्ण झाली. या घटनेतील पीडितेला मराठा क्रांती मोर्चासह शहर व जिल्हात घरोघरी दिवा, मेणबत्ती लावून श्रद्धांजली वाहण्यात आली. 

लॉकडाऊनचे नियम पाळत व फिजिकल डिस्टन्स ठेवत श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी नराधमांना तात्‍काळ फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी मागणीही करण्यात आली. यासह सोशल मिडियावर समाजबांधवांनी दिवसभर श्रद्धांजलीच्या पोस्ट केल्या. 

हेही वाचा- दिलासा... जनता कर्फ्यूतही चारशेहून अधिक कंपन्या राहणार सुरू   

मराठा क्राती मोर्चातर्फे श्रद्धांजली 
कोपर्डीच्या घटनेला आज चार वर्ष पुर्ण झाली. त्या पार्श्‍वभुमीवर मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने कोपर्डीच्या भगिनीला सिडकोतील टाऊन सेंटर परिसरात मराठा आरक्षणाचे याचिकाकर्ते विनोद पाटील, अभिजित देशुमख, राजगौरव वानखेडे, शिवाजी दांडगे, तर टिव्ही सेंटर परिसरात सतिष वेताळ, मनोज गायके, पांडुरंग मेटे, संदीप जाधव, सतिष सोनवणे,वैभव वेताळ, बळीराम दसपुते यांनी श्रद्धांजली अर्पण केली. 

हा दिवस समाज बलिदान दिन म्हणून साजरा
कोपर्डी प्रकरणातील आरोपीवर अद्यापही कारवाई झालेली नाही. याचसंदर्भात मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांची ११ जुलैला ऑनलाइन बैठक झाली. या बैठकीत आरक्षणासंदर्भात चर्चा करण्यात आली. १३ जुलैला कोपर्डी घटना घडली होती. हा दिवस समाज बलिदान दिन म्हणून साजरा करणार आहे.

त्या अनुषंगाने सोमवारी (ता.१३) सायंकाळी सात वाजता एक दिवा, मेणबत्ती लावून कोपर्डी प्रकरणात बलिदान दिलेल्या ताईस अभिवादन करण्याचे आवाहन करण्यात आले  होते. गेल्या तीन दशकांपासून मराठा आरक्षणाचा लढा सुरू आहे. न्यायपालिकेत अडकलेले आरक्षण टिकले पाहिजे, यासाठी शासनाने यात लक्ष देऊन ते समाजाला मिळवून द्यावे, अशी मागणीही या बैठकीत करण्यात आली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com