औरंगाबादला दिलासा: सलग तिसऱ्या दिवशी रुग्णसंख्येत घट, आज २८ रुग्णांची वाढ, एकूण@१२७६

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 24 May 2020

https://www.esakal.com/marathwada/two-coronavirus-positive-patient-found-udgir-taluka-latur-news-296726जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी पॉझिटिव्ह रुग्णसंख्येत कमालीची घट दिसून आली. गत दोन दिवसात अनुक्रमे ३२ व ३० रुग्णानंतर आज (ता.२४) २८ कोरोनाबाधित रुग्णाचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे.  जिल्ह्यात आता कोरोनाबाधितांची एकूण संख्या १२७६ झाली आहे. असे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.

औरंगाबाद: जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी पॉझिटिव्ह रुग्णसंख्येत कमालीची घट दिसून आली. गत दोन दिवसात अनुक्रमे ३२ व ३० रुग्णानंतर आज (ता.२४) २८ कोरोनाबाधित रुग्णाचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे.  जिल्ह्यात आता कोरोनाबाधितांची एकूण संख्या १२७६ झाली आहे. असे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.

हेही वाचा- शिवसेनेच्या नाकीनऊ आणलेल्या या माजी आमदाराने राजीनामा कुठं दिला?

औरंगाबादेत आज आढळलेल्या रुग्ण (कंसात रुग्ण संख्या)
न्याय नगर, गारखेडा (२), टाऊन हॉल (१), सईदा कॉलनी, जटवाडा रोड (३), कैलास नगर (४), राम नगर, एन-२, सिडको (४), नारळीबाग (१), गौतम नगर, जालना रोड (१), संभाजी कॉलनी, सिडको (१), महेश नगर (१), जुना बाजार (१), एमजीएम परिसर (१), भवानी नगर, जुना मोंढा (१), शंकुतला नगर, शहानूरवाडी (१), औरंगपुरा (२), आशियाद कॉलनी, बीड बायपास (१), वडगाव कोल्हाटी (२), अब्दाशहा नगर,सिल्लोड (१) या भागातील कोरोनाबाधित आहेत. यामध्ये १३ महिला आणि १५ पुरूष रुग्णांचा समावेश आहे.
घाटीतून आजवर ४७ जण कोरोनामुक्त
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (घाटी) शनिवारी (ता. २३) सात कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामध्ये चार पुरूष आणि तीन महिला रुग्णांचा समावेश आहे. यामध्ये बारी कॉलनीतील ७० वर्षीय पुरूष, सिटी चौकातील ६५ वर्षीय पुरूष, रोशन गेट येथील ४२ वर्षीय पुरूष, पंचकुवा येथील ३५ वर्षीय महिला, जुना मोंढा येथील २५ वर्षीय महिला, सिल्लेखाना येथील २१ वर्षीय महिला आणि फुलशिवरा ७६ वर्षीय पुरूष रुग्णांचा समावेश आहे.

क्लिक करा- घाबरू नका, तब्बल नव्वद टक्के रुग्ण ठणठणीत बरे होणार

यामुळे घाटीतून आतापर्यंत ४७ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतल्याची माहिती घाटीच्या अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर व माध्यम समन्वयक डॉ. अरविंद गायकवाड यांनी दिली. सध्या घाटी रुग्णालयात ७८ कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यापैकी ६९ जणांची प्रकृती सामान्य असून नऊ जणांची गंभीर आहे.

तसेच घाटीत तीन कोरोनाबाधितांचा मृत्यू झालेला आहे. यामध्ये औरंगाबाद शहरातील बायजीपुरा येथील ६१ वर्षीय पुरूष रुग्णाचा २२ मे रोजी सकाळी ११.४० वाजता, किराडपुऱ्यातील ७५ वर्षीय पुरूष रुग्णाचा २२ मे रोजी संध्याकाळी ११.४० वाजता आणि सिटी चौकातील ७२ वर्षीय पुरूष रुग्णाचा आज पहाटे पाच वाजता मृत्यू झाला आहे. घाटीमध्ये आजपर्यंत ४३ कोरोनाबाधितांचा मृत्यू झालेला आहे, अशी माहितीही त्यांनी दिली आहे.

हे वाचंलत का? - आता पाच मिनिटांत कोरोनाचे निदान; राज्यातील पहिलाच प्रयोग

मिनी घाटीतून सहाजणांना सुट्टी
जिल्हा सामान्य रूग्णालयामध्ये (मिनी घाटी) शनिवारी (ता. २३) सहा कोरोनाबाधितांना डिस्चार्ज देण्यात आला. यामध्ये सातारा परिसरातील ७० वर्षीय महिला, संजयनगरातील ४० वर्षीय पुरूष, पुंडलिक नगरातील ३९ वर्षीय पुरूष, भवानी नगरातील आठ वर्षीय पुरूष आणि ४२ वर्षीय महिला, चिकलठाणा पुष्प गार्डन येथील ६५ वर्षीय  महिला रुग्णांचा समावेश आहे.

तसेच आतापर्यंत एक मृत्यू झाल्याचे मिनी घाटी प्रशासनाने सांगितले. मनपा कार्यक्षेत्रांतर्गत आतापर्यंत खासगी रुग्णालयात चार कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाल्याने एकूण ४८ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाल्याचे महापालिकेच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ.नीता पाडळकर यांनी सांगितले.

हेही वाचा- धक्कादायक: मुंबईहून गावी पळून आलेल्या जवानास कोरोना, गावही रेडझोनमध्ये

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Twenty Eight CornaVirus Positive Patient Found Today, Aurangabad News