Corona: औरंगाबाद@१२१२, रोजच्या सरासरीपेक्षा आजचे रुग्ण कमी, २६ बाधित

मनोज साखरे
Friday, 22 May 2020

औरंगाबादेत कोरोनाचा कहर सुरूच असताना शुक्रवारी (ता.२२) रोजच्या दिलासादायक म्हणजे सरासरीपेक्षा आज बाधितांची संख्या थोडी कमी आली आहे. आज २६ रुग्ण बाधित झाले असून एकूण रुग्णसंख्या १ हजार २१२ झाली आहे. अशी माहिती घाटी रुग्णालयाने दिली आहे.

औरंगाबाद: औरंगाबादेत कोरोनाचा कहर सुरूच असताना शुक्रवारी (ता.२२) रोजच्या दिलासादायक म्हणजे सरासरीपेक्षा आज बाधितांची संख्या थोडी कमी आली आहे. आज २६ रुग्ण बाधित झाले असून एकूण रुग्णसंख्या १ हजार २१२ झाली आहे. अशी माहिती घाटी रुग्णालयाने दिली आहे.

आज वाढले २६ रुग्ण (कंसात बाधितांची संख्या)
जयभीमनगर (५),  गरामपाणी (२), रहेमानिया कॉलनी (२), कुवारफल्ली, राजाबाजार (१), सुराणानगर, भालचंद्र एपिटी (१),  मिलकॉर्नर, पोलिस कॉलनी (१), न्यायनगर, गल्ली क्रमांक सात (२), भवानीनगर, जुना मोंढा, गल्ली क्रमांक पाच (२), रहीमनगर, लेन क्रमांक चार, जसवंतपुरा (१), पुंडलिकनगर, गल्ली क्रमांक दहा (१), सातारा परिसर (१), जवाहर कॉलनी (१), न्यायनगर (२), टाइम्स कॉलनी, कटकटगेट (३),  सिडको एन -२,  ठाकरे नगर (१) या भागातील हे बाधित रुग्ण आहेत. सोळा पुरुष आणि दहा महिलांचा यात समावेश आहे. तर आठ वर्षीय दोन मुलं आणि सत्तर वर्षीय एक महिला आणि पुरुष  असे  सर्वात जास्त आणि कमी वयीन रुग्ण आज बाधित झालेल्यांपैकी आहेत.

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठीक्लिक करा
आकडे बोलतात...
एकूण रुग्ण - १२१२
मृत्यू  -४२
उपचार - ६५८
बरे झालेले  - ५१२

मागील तीन बळीचे विवरण (एकूण ४२ जणांचा मृत्यू )
४० वा बळी
रहेमानिया कॉलनीतील ६५ वर्षीय पुरुषाला २० मे रोजी घाटी रुग्णालयात भरती करण्यात आले होते. त्याच दिवशी त्यांची कोविड चाचणी करण्यात आली. दरम्यान त्यांचा सकाळी साडेदहाच्या सुमारास मृत्यू झाला. त्यांचा चाचणी अहवाल सांयकाळी पॉझिटिव्ह आला. त्यांचा बायलॅटरल न्यूमोनियाटीस ड्युटू कोविड -१९,  हायपरटेन्शन यामुळे मृत्यू झाला.

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

४१ वा बळी
आसेफिया कॉलनीतील ४८ वर्षीय पुरुषाला १९ मे रोजी घाटी घाटी रुग्णालयात भरती करण्यात आले होते. त्याच दिवशी त्यांची कोविड चाचणी करण्यात आली. दरम्यान त्यांचा २० मे रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास मृत्यू झाला. त्यांचा कोविड चाचणी अहवाल सांयकाळी पॉझिटिव्ह आला. त्यांच्या मृत्यूचे कारण बायलॅटरल न्यूमोनियल सेप्सीस विथ सेफ्टीक शॉक विथ टाईप वन रेस्पायरेटरी फेल्युअर विथ टाईप टू डायबेटीस मेलिटस विथ हायपरटेन्शन विथ इचेमिक हार्ट डिसीज स्टेटस पोस्ट परक्यूटेनियस कोरोनरी अँजियोप्लास्टी हे कारण आहे.

४२ वा मृत्यू
खडकेश्वर परिसरातील यशोमंगल सोसायटी (सिटिझन हॉटेल) येथील ५५ वर्षीय करोनाबाधित पुरुषाचा उपचारादरम्यान खासगी रुग्णालयामध्ये २१ मे रोजी  सकाळी मृत्यू झाला. त्यामुळे जिल्ह्यातील करोनाबाधितांच्या मृत्युची संख्या ४२ झाली आहे.
 या रुग्णाला १८ मे रोजी शहरातील खासगी रुग्णालयामध्ये भरती करण्यात आले होते. उपचारादरम्यान दोन्ही फुफ्फुसांचा न्युमोनिया, गंभीर श्वसनविकार तसेच हृदयविकारामुळे संबंधित रुग्णाची प्रकृती खालावली होती. या रुग्णाचा गुरुवारी सकाळी ११ वाजता मृत्यू झाला. असे रुग्णालयाकडून सांगण्यात आले.

महाराष्ट्रातील इतर बातम्या बाचण्यासाठी - क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Twenty Six CoronaVirus Positive Patient Today Aurangabad News