CoronaUpdate : औरंगाबादेत दोन कोरोनाबाधितांचा मृत्यू, बारा जण पॉझिटिव्ह

मनोज साखरे
Monday, 17 August 2020

औरंगाबाद जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग अजूनही वेगात सुरु आहे. आज सोमवारी (ता.१७) सकाळी १२ रुग्णांचे अहवाल सकाळी पॉझिटिव्ह आले. दोन कोरोना बाधितांचा मृत्यू झाला असून एकूण कोरोनाबधित रुग्णांची संख्या १८ हजार ८०१ झाली आहे.

औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग अजूनही वेगात सुरु आहे. आज सोमवारी (ता.१७) सकाळी १२ रुग्णांचे अहवाल सकाळी पॉझिटिव्ह आले. दोन कोरोना बाधितांचा मृत्यू झाला असून एकूण कोरोनाबधित रुग्णांची संख्या १८ हजार ८०१ झाली आहे. त्यापैकी १३ हजार ८८४ बरे झाले असून ५८९ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या ४ हजार ३२८ जणांवर उपचार सुरु आहेत.

औरंगाबादेत एका खासगी रुग्णालयात रांजणगाव, वाळूज येथील २७ वर्षीय आणि त्रिमूर्ती चौक, बजाज नगर येथील ८५ वर्षीय पुरूष कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.
ग्रामीण भागातील रुग्ण (कंसात रुग्ण संख्या) : जामगाव रोड, गंगापूर (७), विठ्ठल मंदिर परिसर, गंगापूर (१), पाण्याच्या टाकीजवळ, सिल्लोड (१)
शहरातील रुग्ण - बन्सीलाल नगर (१), पोलिस कॉलनी, मिल कॉर्नर (१), सातारा परिसर (१)

वाचा: जागरण गोंधळ घालत सरकारचा निषेध, मराठा समाजाच्या मागण्यांसाठी आंदोलन

संततधार पावसामुळे गोदावरीला पूर
कायगाव (जि.औरंगाबाद) : पावसामुळे नाशिक, नगर जिल्ह्यांतून पाण्याचा ओघ कायगाव टोका (ता. गंगापूर) येथे पोचल्याने शनिवारी (ता. १५) गोदावरी नदीला पूर आला. दरम्यान, पाणीपातळीत वाढ होत असल्याने नदीकाठच्या रहिवाशांना सतर्कतेचा इशारा देऊन, त्यांनी सुरक्षितस्थळी राहावे, यासाठी प्रशासनाने त्यांना जागरूक केले आहे. ता. ११ ऑगस्टच्या रात्रीपासून परिसरात सर्वत्र संततधार पाऊस सुरू झाला. त्याने गोदावरी पाणलोट क्षेत्रासह वरील भागातील पाणीपातळीत वाढ झाली. गोदावरीला पूर आल्याने शनिवारच्या स्वातंत्र्यदिनाच्या सुटीचा लाभ घेत अनेकजण पूर पाहण्यासाठी येथे आले.

सध्या पुराचे पाणी नदीपात्र भरून जायकवाडी जलाशयाच्या दिशेने वाहत आहे. जुने अमळनेर (ता. गंगापूर) शिवारात जायकवाडी जलाशयाच्या पाण्याचा फुगवटा असल्यामुळे पाणी पात्राबाहेर पांगत आहे. नदीलगतच्या गाळपेरा क्षेत्रात शेती करून राहणाऱ्या आणि पुनर्वसित गावच्या ग्रामस्थांनी पूर परिस्थितीदरम्यान सतर्कता बाळगून सुरक्षितस्थळी राहावे; तसेच नदीकाठावरील कृषी पंप, वायर काढताना खोल पाण्यात उतरू नये, दक्षता घ्यावी, असे आवाहन महसूल प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

हेही वाचा ः पीएचडी हवी द्या साठ हजार, मराठवाडा विद्यापीठातील अजब प्रकार

शेती पिकांचे नुकसान
संततधार पावसाने जनजीवन विस्कळित झाले असून, सर्वत्र शेतशिवार ओलेचिंब होऊन नदी-नाले खळखळून वाहू लागले आहेत. या पावसाने चारा- पाण्याचा प्रश्न सुटला; पण अतिपाण्याने सर्वच शेती पिकांचे अतोनात नुकसान होत आहे. शेती पिकांचे तालुका प्रशासनाने तत्काळ पंचनामे करण्याची गरज आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Two Corona Patients Died Aurangabad News