esakal | वीज अंगावर पडुन दोन ठार, पाचजण जखमी
sakal

बोलून बातमी शोधा

वीज अंगावर पडुन दोन ठार, पाचजण जखमी

जखमींवर आडुळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी डॉ. निलकंठ चव्हाण, सुरेंद्र कुलकर्णी, रोहिना सय्यद यांनी प्रथमोपचार केल्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी औरंगाबादला पाठविले.

वीज अंगावर पडुन दोन ठार, पाचजण जखमी

sakal_logo
By
मुनाफ शेख

आडुळ: (जि. औरंगाबाद) ब्राम्हणगाव (ता. पैठण) शिवारात नवीन विहिरीचे खोदकाम करणाऱ्या मजुरांच्या अंगावर बुधवारी (ता. १३)दुपारी साडेतीनच्या सुमारास वीज कोसळून दोन ठार तर पाचजण गंभीर जखमी झाले. मृतामध्ये साहेबराव भाऊराव चव्हाण (वय ५०  रा. देवगाव तांडा), सतीश जानु राठोड (वय २५, रा. एकतुनी तांडा) यांचा समावेश आहे.

साहेबराव चव्हाण यांच्या मालकीच्या ब्राम्हणगाव शिवारातील शेतात (गट क्रमांक ८२) नविन विहिरीचे खोदकाम सुरु आहे. बुधवारी दुपारी विजेच्या कडकडाटासह वादळी वारे सुटल्याने विहिरीवर काम करणारे सर्व मजुर बाजुच्या लिंबाच्या झाडाखाली सोडलेल्या बैलगाडीखाली आडोशाला बसले.

त्याच वेळी अंगावर विज कोसळून साहेबराव भाऊराव चव्हाण (वय ५०, रा. देवगाव तांडा), सतीश जानु राठोड (वय २५) , अमोल तुळशीराम राठोड (वय २७), युवराज श्रीधर राठोड (वय ३०), जैतालाल प्रभु चव्हाण (वय २३), नितेश पंढरीनाथ चव्हाण (वय २५), निलेश सुभाष चव्हाण (वय २०), सर्व राहणार एकतुनी तांडा (ता.पैठण) हे गंभीर जखमी झाले.

हेही वाचा- आता अंत्यदर्शन ही एक फुटावरुन

जखमींवर आडुळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी डॉ. निलकंठ चव्हाण, सुरेंद्र कुलकर्णी, रोहिना सय्यद यांनी प्रथमोपचार केल्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी औरंगाबादला पाठविले. दरम्यान रस्त्यातच साहेबराव भाऊराव चव्हाण या शेतकऱ्याचा मृत्यु झाला. औरंगाबादला उपचारादरम्यान सतीश जानु राठोड याचा मृत्यू झाला. पाचोड पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक अतुल येरमे यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार युवराज शिंदे, बिट जमादार तात्यासाहेब गोपालघरे यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला.

गोठ्यावर वीज पडूनशिवगड तांड्यावर बैलाचा मृत्यू

शिवगड तांडा (ता. पैठण) येथे वादळी वाऱ्यासह गोठ्यावर वीज कोसळल्याने गोठ्यात बांधलेल्या एका बैलाचा मृत्यु झाला. या बैलाची अंदाजे किंमत साठ हजार होती. तांड्यावरील अनेक घरावरील पत्रे उडाली. अनेक घरांचे नुकसान झाले. जगन धनसिंग चव्हाण या शेतकऱ्याचा हा बैल होता. आबासाहेब गोविंद चव्हाण, संजय रोहिदास राठोड, हरी धनसिंग चव्हाण यांच्यासह अनेकांच्या घरावरील पत्रे उडून संसारोपयोगी साहित्याचे नुकसान झाले.       

go to top