दुचाकी-कारच्या अपघातात तीन जण गंभीर जखमी, आडुळ शिवारातील घटना 

शेख मुनाफ
Saturday, 28 November 2020

आडुळ:औरंगाबाद-सोलापुर राष्ट्रिय महामार्गावरील घटना...

आडुळ (औरंगाबाद) : समोर चालत असलेल्या दुचाकीला माठीमागून भरधाव वेगाने येणारया नॅनो कारने जोराची धडक दिल्याने दुचाकीस्वार दोन व कार चालक असे तीन जण गंभीर जखमी झाल्याची घटना औरंगाबाद-सोलापुर राष्ट्रीय महामार्गावरील आडुळ (ता.पैठण) शिवारात शनिवारी (ता.२८) रोजी सांयकाळी पाच वाजेच्या सुमारास घडली.

 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!
ञिंबक हिरालाल बमनावत (वय ५२ वर्षे), रुपसिंग हरसिंग घुनावत (वय ४० वर्षे), दोघे राहणार पिवळवाडी (ता.जि.औरंगाबाद) हे दुचाकी क्रमांक एम एच २० एएक्स ६४०५ ने रजापुरहुन गावी पिवळवाडीकडे परत जात होते. त्यावेळी पाचोडकडूनच भरधाव वेगाने येणारी नॅनो कार क्रमांक एमएच ४३ एएफ १०४ ने पाठीमागून जोराची धडक देवून दुचाकीला जवळपास पुढे शंभर फुटापर्यंत फरफटत नेले. यात दुचाकीस्वार ञिंबक बमनावत व संजय घुनावत हे दोघे तर दुचाकीला उडविल्यानंतर अपघातग्रस्त कारने ही रस्त्याच्या खाली जावुन दोन तीन पलट्या घेतल्याने कार चालक रोकडे राहणार औरंगाबाद असे एकूण तीघे गंभीर जखमी झाले आहेत.

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

नेमके याच वेळेस घटनास्थवरुन अवघे दोनशे फुटाच्या अंतरावर राष्ट्रीय महामार्गावर आपले कर्तव्य बजावत असतांना महामार्गाचे पोलिस उपनिरिक्षक हरेश्वर घुगे, सहायक फौजदार बलभिम गोरे, पोलिस हवालदार राजु गोल्डे, दिलीप पाटील, ईश्वरसिंग जारवाल, पाचोड पोलिस ठाण्याचे रविंद्र क्षिरसागर अदी कर्मचारयांनी तत्काळ अपघातस्थळी धाव घेवुन मदतकार्य करीत वाहतुक सुरळीत केली. १०८ रुग्णवाहिकेचे डॉक्टर अस्लम सय्यद, चालक तातेराव वाघ यांनी जखमींना पुढील उपचारासाठी औरंगाबाद येथे हलविले. या अपघाताची नोंद पाचोड पोलिस ठाण्यात घेण्यात आली असून ठाण्याचे सहायक पोलिस निरिक्षक अतुल येरमे यांच्या मार्गदर्शनाखाली पाचोड पोलिस करीत आहे.

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

(संपादन-प्रताप अवचार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: two-wheeler accident two seriously injured