कन्नडचे आजी-माजी आमदार नागद ग्रापंचायत निवडणुकीत समोरासमोर; उदयसिंग राजपूत, नितीन पाटलांची प्रतिष्ठा पणाला

मनोज पाटील
Wednesday, 6 January 2021

नागद (ता.कन्नड) ग्रामपंचायतीच्या निवडणुकीकडे जिल्ह्याचे लक्ष वेधले गेले आहे. कारण विद्यमान आमदार उदयसिंग राजपूतविरुद्ध माजी आमदार नितीन पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. 

नागद (जि.औरंगाबाद) : नागद (ता.कन्नड) ग्रामपंचायतीच्या निवडणुकीकडे जिल्ह्याचे लक्ष वेधले गेले आहे. कारण विद्यमान आमदार उदयसिंग राजपूतविरुद्ध माजी आमदार नितीन पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.  नागद येथील ग्रामपंचायत ही ग्रुप ग्रामपंचायत आहे. या ग्रामपंचायतीची स्थापना १९५८ मध्ये झाली असून यामध्ये पांगरा, पांगरा तांडा, रामपुरा या गावांचा समावेश आहे. या ग्रुप ग्रामपंचायतीमध्ये एकूण पंधरा सदस्य आहेत. यामध्ये नागद येथे चार प्रभाग आहे. यामध्ये बारा सदस्य असून पांगरा, पांगरातांडा, रामपुरा हे तीन गावे मिळून एक प्रभाग आहे. तेथे तीन सदस्य आहेत. या ग्रामपंचायतीचे पहिले सरपंचपद नाना मोतीराम पाटील व उपसरपंचपद मोहनसिंग तोताराम भगत यांनी भूषविले होते.

पती हर्षवर्धनविरोधात संजना जाधव निवडणुकीच्या रणांगणात, मुलाचे आईविरुद्ध पॅनल

नागद ग्रुप ग्रामपंचायतीवर आतापर्यंत आप्पासाहेब  नागदकर सुरेशदादा पाटील तसेच  माजी आमदार नितिन पाटील यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाचे वर्चस्व राहिले आहे. मागील  पंचवार्षिक निवडणूक ही चुरशीची झाली होती. या निवडणुकीत नागद येथील चार प्रभागामधून उदयसिंग राजपूत यांचे सहा व माजी आमदार नितिन पाटील यांचे सहा सदस्य निवडुन आले होते.

औरंगाबाद रेल्वेस्थानकाला पोलिस संरक्षण, नामांतरासाठी मनसेकडून आंदोलनाची शक्यता

प्रभाग क्रमांक पाच पांगरा पांगरातांडा, रामपुरा येथून निवडून आलेल्या तीन सदस्यांनी नितीन पाटील यांच्या पॅनलला पाठिंबा दिल्यामुळे नितीन पाटील यांचे वर्चस्व प्रस्थापित राहिले होते. परंतु गेल्या निवडणुकीत उदयसिंग राजपूत हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात होते व आमदारपदी नव्हते. परंतु त्यांच्याकडे आमदारपद असल्याने ते नागद ग्रुप ग्रामपंचायत आपल्या ताब्यात  घेण्यासाठी प्रतिष्ठा पणाला लावलेली आहेय. तर माजी आमदार नितीन पाटील यांनी सुद्धा ग्रामपंचायत आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. यावेळी या निवडणुकीत दोघे पॅनलमध्ये अटीतटीचा सामना रंगणार आहे. या ग्रामपंचायत निवडणुकीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे

 

संपादन - गणेश पिटेकर
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Udaysing Rajput, Nitin Patil Stand Before Eachother In Gram Panchayat Elections Aurangabad