जिल्ह्यातील ५ लाख महिलांच्या जनधन खात्यात २७ कोटी जमा

file photo
file photo

औरंगाबाद: भारत सरकारच्या गरीब कल्याण पॅकेजच्या नुसार महिलांच्या जनधन बचत खात्यामध्ये प्रत्येकी पाचशे रुपये जमा होण्याची प्रक्रिया जिल्ह्यात सुरू झाली आहे. जिल्ह्यात ५ लाख ३५ हजार महिलांच्या जनधन खात्यात २६ कोटी ७५ रुपये जमा झाले आहेत. पुढील तीन महिने ही रक्कम महिलांच्या खात्यावर जमा होणार आहे.अशी माहिती अग्रणी जिल्हा व्यवस्थापक श्रीकांत कारेगांवकर यांनी दिली. 

कोरोना पार्श्वभूमीवर देशात लोक डाऊन आहे. त्यामुळे सारा देश ठप्प झाला आहे. यात सर्वसामान्यांची अडचण होऊ नये, यासाठी केंद्र व राज्य सरकारतर्फे विविध उपाययोजना केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी गरीब कल्याण पॅकेजच्या माध्यामातून देशातील महिलांच्या जनधन खात्यावर पाचशे रुपये जमा करण्याचे घोषणा केली होती.

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात ही रक्कम जनधन खात्यात जमा करण्याची प्रक्रियाही युद्धपातळीवर सुरू आहे. जिल्ह्यात ५ लाख ३५ हजार महिलाचे जनधन खाते आहे.या खात्यात ही रक्कम थेट जमा केली आहेत. ही रक्कम आता महिला त्यांच्या जनधन खात्यामधून काढू शकता. 

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

तीन महिन्यात जिल्ह्यात मिळणार ८० कोटी 
जनधन खात्याच्या माध्यमातून महिलांना एप्रिल, मे व जून महिन्यात प्रत्येकी पाचशे रुपये मिळणार आहेत. प्रत्येक महिन्यात २६ कोटी ७५ लाख प्रमाणे तीन महिन्यात ८० कोटी २५ लाख रुपये या ५ लाख ३५ हजार महिलांच्या जनधन खात्यात जमा होणार आहेत.अशी माहितीही श्री.कारेगांवकर यांनी दिली. 
 


केंद्र सरकारच्या आदेशानुसार महिलांच्या जनक बचत खात्यामध्ये प्रत्येकी पाचशे रुपये जमा होण्यास सुरूवात झाली आहे. व यांना पैसे काढण्याची साठी ही नियमावली बनवण्यात आली आहे त्यानुसार त्यांनी पैसे काढण्यासाठी बँकेत जावे असे आवाहन आम्ही सर्व महिलाना करत आहोत. 
-श्रीकांत कारेगांवकर, जिल्हा व्यवस्थापक, अग्रणी बँक, 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com