तीने बाळाला पाळण्यात ठेवून केले पलायन, तेव्हा 'साकार'ने हात साकारले!

मनोज साखरे
Friday, 4 December 2020

साकार शिशुगृहाच्या पाळण्यात चार दिवसांच्या चिमुकलीला ठेवून पालकांनी पलायन केले. पलायनापूर्वी पालकांनी शिशिगृहाची घंटी वाजवली होती. ही गंभीर घटना आज (ता. एक) उघडकीस आली. 

औरंगाबाद : साकार शिशुगृहाच्या पाळण्यात चार दिवसांच्या चिमुकलीला ठेवून पालकांनी पलायन केले. पलायनापूर्वी पालकांनी शिशिगृहाची घंटी वाजवली होती. ही गंभीर घटना आज (ता. एक) उघडकीस आली. 

 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

साकार संस्था चिमुकल्यांचे संगोपन करते. याच बाबींचा फायदा घेत नको असलेल्या चिमुकलीला पालकांनी तेथील पाळण्यात ठेवले. मुलीला लगेच शिशुगृहातील व्यक्तींनी पाहून ताब्यात घ्यावे या उद्देशाने पालकांनी तेथील घंटी वाजविली व लगेच पलायन केले. घंटी वाजल्याने लगेच आतून मुलींचे संगोपन करणारी महिला बाहेर आली. 

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

त्यावेळी तिला पाळण्यात बाळ दिसले. तिने लगेचच बाळ ठेवणाऱ्याला शोधू लागली पण जवळपास कुणीही व्यक्ती दिसली नाही. याबाबत ‘साकार’च्या सामाजिक कार्यकर्त्यांनी उस्मानपूरा पोलिसांना माहिती दिली. बाळाला बेवारस ठेवून पलायन केल्याप्रकरणी गुन्ह्याची नोंद करण्यात आली. बाळाच्या पालकांनी बालकल्याण समिती किंवा जिल्हा बालसंरक्षण कक्ष अथवा उस्मानपूरा पोलिस ठाण्यात संपर्क करुन पालक म्हणून दावा सिद्ध करावा अन्यथा बाळाचे कायदेशिर पुनर्वसन करण्यात येईल, असे साकार संस्थेतर्फे सांगण्यात आले. 

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

(संपादन-प्रताप अवचार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: unidentified woman removed baby placing in Sakars bed