"चिवटी' गाजवतोय विविध फिल्म फेस्टिव्हल

file photo
file photo

औरंगाबाद: "शिवाजी अंडरग्राउंड इन भीमनगर मोहल्ला' या गाजलेल्या नाटकातून रंगभूमीवर स्वत:चा ठसा उमटवलेल्या लेखक आणि अभिनेता राजकुमार तांगडे यांनी दिग्दर्शित केलेला "चिवटी' हा सिनेमा तयार केला. साखर ही जीवनावश्‍यक वस्तू व त्यामागे होणारे राजकारण असे वेगळ्या धाटणीचे कथानक घेऊन तयार केलेल्या या सिनेमातून जगण्याची पद्धत मांडण्यात आली आहे. हा सिनेमा मुंबई फिल्म फेस्टिव्हलमध्ये (मामी) चांगलाच गाजला. त्यानंतर पुणे फिल्म फेस्टिव्हल आणि आता नागपूर येथे होणाऱ्या ऑरेंज सिटी फिल्म फेस्टिव्हलमध्ये या सिनेमाची स्क्रीनिंग होणार आहे. यामुळे प्रदर्शनापूर्वीच "चिवटी' वेगवेगळ्या फेस्टिव्हलमध्ये घोडदौड करीत आहे. 

सामाजिक जाणीव असलेला रंगकर्मी म्हणून तांगडे यांची ओळख आहे. जालना जिल्ह्यातील जाबं समर्थ येथून राजकुमार यांनी नाट्यचळवळ उभी केली. त्यातून "शिवाजी अंडरग्राउंड इन भीमनगर मोहल्ला' हे नाटक पुढे आले. राज्यभरासह विविध ठिकाणी याचे साडेसातशेहून अधिक प्रयोग झाले आहेत. त्याने केलेल्या कलाकृतीतूनही त्याची सामाजिक, राजकीय समज दिसली आहे.

साखरेच्या माध्यमातून चालणारे राजकारण

चिवटीतून साखरेच्या माध्यमातून चालणारे राजकारण दाखविण्याचा प्रयत्न केला आहे. या सिनेमाची कथा, पटकथा, संवादाचे लेखनही तांगडे यांनीच केले आहे. मराठवाड्यातील बीड, जालना यासह विविध ठिकाणी याचे चित्रीकरण झाले. बीडचे अजिनाथ ढाकणे आणि कैलास सानप हे सिनेमाचे निर्माते आहेत. त्यांच्यासह अभिनेता मिलिंद शिंदे, संभाजी तांगडे, अश्विनी भालेकर, गौरी कोंगे, गजेंद्र तांगडे, मधुकर बिडवे, अशोक देवकर, देवकी खरात आणि किशोर उढाण यांच्या सिनेमात भूमिका आहेत. जालन्यासारख्या भागात नाटकाचे वातावरण तयार करण्यात तांगडे यांचा मोठा वाटा आहे. 

तांत्रिक दुष्ट्या आव्हानात्मक 
'शिवाजी अंडरग्राउंड इन भीमनगर मोहल्ला' या नाटकामुळे राज्यभर परिचित झालेले लेखक-दिग्दर्शक राजकुमार तांगडे यांनी चित्रपट दिग्दर्शनात पदार्पण केले आहे. नाटकात प्रयोगशीलता जपलेल्या तांगडे यांनी चित्रपटातही वेगळा प्रयत्न केला आहे. 'चिवटी'च्या निमित्ताने मराठवाड्यातील कलाकृती प्रथमच विविध फिल्म फेस्टिव्हल मध्ये झळकली आहे. तंत्राशी निगडीत चित्रपट माध्यमाचा आवाका मोठा आहे. त्यामुळे 'चिवटी' करणे आव्हानात्मक होते, असे तांगडे यांनी सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com