भाज्यापाल्यांनी खाल्ला ‘भाव’; सर्वसामान्यांच्या खिशाला झळ, आवक घटल्याचा परिणाम

4Vegetable_14
4Vegetable_14

औरंगाबाद : गेल्या आठवड्यात झालेल्या पावसामुळे भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाले. यातच बाजार समितीत भाज्यापाल्यांची होणाऱ्या आवकेवर मोठा परिणाम झाल्याने किरकोळ बाजारात भाजीपाल्याचे दर चांगलेच वाढले आहेत. सध्या फळे स्वस्त व भाजीपाला महाग झाला आहे. गेल्या आठवड्यात टोमॅटोने भाव खाला होता. आता कोथिंबिरीची जुडी २० ते ३० रुपयाला विक्री होत आहे. यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला चांगलीच झळ बसत आहेत.


बाजार समितीत ठोक बाजारात मात्र भाजीपाल्यास अपेक्षित दर मिळत नाही. दुसरीकडे किरकोळ बाजारात मात्र भाजीपाल्याच्या किमतीचे भडका उडताना दिसून येत आहे. बाजार समितीत शनिवारी (ता. तीन) तीन हजार ७०० नग कोथिंबिरीची आवक झाली. त्यास एक हजार रुपयांचा सरासरी दर मिळाला. मेथीही सहा हजार ४०० नग, शेवगा २० क्विंटल, वांगे १५ क्विंटल, काकडी २० क्विंटल, कोबी २२ क्विंटल, कांदा ६६४ क्विंटल, पालक पाच हजार ५०० नग, दोडका ४ क्विंटल, टोमॅटो ११७, मिरची २५ क्विंटल, गवार तीन क्विंटल, ढोबळी मिरची नऊ क्विंटल, भेंडी २४ क्विंटल आवक झाली आहे. गेल्या आठवडाभरापासून आवकमध्ये लक्षणीयरीत्या घट झाल्याने ही दरवाढ झाली असल्याचेही बाजार समितीतर्फे सांगण्यात आले.


किरकोळ बाजारात (बाजार समिती आणि हातगाडीवर विक्री होणारा भाजीपाला)
------
कोथिंबीर---------- २० ते ३० रुपये जुडी
मेथी-------------- १५ ते २० रुपये जुडी
पालक-------------१५ ते २० रुपये जुडी
शेफू--------------- १५ ते २० रुपये जुडी
टोमॅटो--------------३० ते ४० रुपये किलो
बटाटे-------------- ३५ ते ४० रुपये किलो
वांगे--------------- ३५ ते ४० रुपये किलो
शेंवगा ------------- ६५ ते ७० रुपये किलो
मिरची--------------- ४० ते ५० रुपये किलो
भोपळा-------------- ३० ते ४० रुपये किलो
लिंबू --------------- ३५ रुपये किलो
भेडी---------------- ४० रुपये किलो
चवळी शेंग---------- ३५ रुपये किलो
आले---------------- ५० ते ५५ रुपये किलो
कांदा--------------- ३० रुपये किलो
कारली-------------- ३० रुपये किलो
फ्लॉवर------------- २५ ते ३० रुपये किलो
कोबी-------------- २५ ते ३० रुपये किलो

संपादन - गणेश पिटेकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com