शेताजवळ जमाव जमविणे पडले महागात 

शेताजवळ जमाव जमविणे पडले महागात 

सिल्लोड (जि.औरंगाबाद): राज्यासह देशात संचारबंदी लागू असतांना केळगाव (ता.सिल्लोड) येथे सार्वजनिक ठिकाणी जमाव करून संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्या पाच जणांच्या विरोधात शुक्रवार (ता. २७) रोजी सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

याप्रकरणी सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक पंडित इंगळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पाच जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हे दाखल झालेले पाच ही जण एका शेताजवळ सार्वजनिक रस्त्यावर जमाव करुन उभे होते.

या सर्वांनी संचारबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याने त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक विकास आडे, कर्मचारी देविदास जाधव, पोलीस नाईक सचिन सोनार, काकासाहेब सोनवणे, दीपक इंगळे यांनी केली. 

ग्रामीण भागात अनेक ठिकाणी गर्दी 

ग्रामीण भागात शक्यतो पोलिस जात नाही. मात्र गावाच्या वेशीवर तरुण मोठ्या संख्येने जमा करुन दिवसभर बसून राहतात. शासनाकडून दिलेल्या निर्देशाचे यामध्ये पालन केले जात नाही. हा प्रकार सकाळपासून तर रात्री पर्यंत चालतो. सध्या ग्रामीण भागात भीतीचे वातावरण असल्याने अनेक जण हे गावात विविध ठिकाणी टोळक्याने फिरत आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com