संतप्त गावकऱ्यांनी पाण्यासाठी जाळल्या ग्रामसेवक, सरपंचांच्या खुर्च्या! वारंवार विनंती करुन ही होईना उपयोग

बाबासाहेब ठोंबरे
Monday, 11 January 2021

गेल्या आठ दिवसांपासून गावकऱ्यांना पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामपंचायत पाणीपुरवठा करण्यास असमर्थ ठरले आहे.

पीरबावडा (जि.औरंगाबाद) : फुलंब्री तालुक्यातील गेवराई पायगा येथील गावकऱ्यांना गेल्या आठ दिवसांपासून पिण्याचे पाणी मिळत नाही. त्यामुळे वारंवार मागणी केल्यानंतरही ग्रामसेवक, सरपंच, उपसरपंच आदी पदाधिकारी पाणीपुरवठा करण्यास असमर्थ ठरल्याने त्यांच्या खुर्च्या रविवारी (ता.दहा) जाळण्यात आल्या.

गेल्या आठ दिवसांपासून गावकऱ्यांना पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामपंचायत पाणीपुरवठा करण्यास असमर्थ ठरले आहे. त्यांना वारंवार विनंती केल्यानंतरही पाणीपुरवठा होऊ शकला नाही. म्हणून संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी ग्रामसेवक, सरपंच, उपसरपंच याच्यां खुर्चा जाळल्या. या नंतरही २४ तासांत पाणीपुरवठा न केल्यास सरपंच व ग्रामसेवक यांना गाव बंदी करण्यात येईल, असा इशारा प्रहार युवा तालुकाध्यक्ष मंगेश साबळे यांनी दिला आहे
 

औरंगाबादच्या आणखी बातम्या वाचा

एका दिवसापूर्वी विद्युत पंप खराब झाल्याने गावाला एक दिवस पाणी नाही भेटले. परंतु आम्ही औरंगाबाद येथे महावितरण अभियंता भेट घेण्यासाठी गेलो असता. गावांमधून फोन आला की मंगेश साबळे यांनी पेट्रोलची बाटली घेऊन ग्रामपंचायत कुलूप तोडून महत्त्वाची कागदपत्रे रक्कम व ग्रामसेवक व सरपंच व ग्रामपंचायत सदस्य  यांच्या खुर्च्या जाळून टाकल्या. या प्रकरणी आम्ही ग्रामसेवक व आम्ही मध्यरात्री पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करणार आहोत.
- भाऊसाहेब साबळे, उपसरपंच, गेवराई पायगा

 

 

संपादन - गणेश पिटेकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Villagers Set Fire Sarpanch, Vice Sarpanch Chairs Aurangabad Latest News