लॉकडाउन पावले...पक्षी सुखावले अन् खोपेही विणू लागले 

photo
photo

औरंगाबाद ः अरे खोप्यामधी खोपा सुगरणीचा चांगला...देखा पिलासाठी तिनं झोका झाडाले टांगला! या ओळी आहेत कवियत्री बहिणाबाई चौधरी यांच्या कवितेच्या. सर्वोत्कृष्ट समजल्या जाणाऱ्या या खोप्यांची संख्या कमी होत असतानाच यंदा आशादायी चित्र आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत सुगरणीच्या खोप्यात यंदा वाढ झाली आहे. लॉकडाऊननंतर ती वाढल्याचे निरीक्षण एच. टु. ओ. ॲण्ड सॉईल इनव्हारमेन्ट रिसर्च फाऊंडेशनने नोंदवले आहे. 

एच. टु. ओ. ॲण्ड सॉईल इनव्हारमेन्ट रिसर्च फाऊंडेशनने गेल्या काही वर्षापासून विविध पक्षांचा आभ्यास केला आहे. फाऊंडेशनने गेल्या वर्षी शहर परिसरातील सुगरण पक्षांचे निरिक्षण करुन खोप्यांची गणना केली होती. त्यावेळी ५४० खोप्यांची संख्या आढळली तर त्या लोकेशनला यंदा ५८८ घरटी आढळून आली. लॉकडाऊननंतर पर्यावरण सुधारले आहे, कदाचित त्याचाच हा परिणाम असल्याचे संस्थेचे अध्यक्ष पक्षीमित्र संदीप भाले यांनी सांगीतले. 

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

दिवसेंदिवस वाढणाऱ्या सिमेंटच्या जंगलाबरोबरच वाढत्या वृक्षतोडीने झाडांची संख्याही झपाट्याने कमी होत आहे. त्यामुळेच सुगरणीच्या खोप्यांची संख्या कमी होत आहे. सुगरण नराला घरटे विणण्यास जागा मिळत नाही. असे असले तरीही यंदा मात्र समाधानकारक बदल दिसला. श्री. भाले व त्यांच्या टीमने परिसरातील अकरा ठिकाणी प्रत्यक्ष भेटी देऊन पहाणी केली. त्यावेळी गतवर्षीपेक्षा ४८ घरटे अधिक आढळले. या पक्ष्याचा मे ते सप्टेंबरदरम्यान विणीचा हंगाम असून या काळात सुगरण नर घरटे विणण्यास सुरवात करतो. 

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

अशी आहे परिस्थिती 

२० जुलै ते २७ जुलै २०१९ (आढळलेली घरटी) 
विद्यापीठ-७८, हिमायतबाग-८२, जटवाडा-४०, सावंगी-६५, शेंद्रा-५५, कुंभेफळ-३०, सातारा परिसर-७०, चिकलठाणा-१४, कांचनवाडी-४०, वाळुज-४०, पडेगाव-२६. 

महाराष्ट्रातील इतर बातम्या बाचण्यासाठी क्लिक करा

२० जुलै ते २७ जुलै २०२० (आढळलेली घरटी) 

विद्यापीठ-८६, हिमायतबाग-८५, जटवाडा-४४, सावंगी-७०, शेंद्रा-५९, कुंभेफळ-३६, सातारा परिसर-७३, चिकलठाणा-२३, कांचनवाडी-४०, वाळुज-४४, पडेगाव-२८. 

सुगरण मुख्यतः धान्य बिया आणि पिकांवरील कीड यावर जगते. घरटी बांधण्यासाठी यांची पसंती पाम ट्री, बोरी, बाभळी सारख्या काटेरी झुडपांना असते. या झाडांची कत्तल होत असल्याने त्यांची संख्या झपाट्याने कमी होत आहे. 
-संदीप भाले, पक्षीमित्र 

सुगरण पक्षी उत्तम किटक व अळ्यानाशक असल्याने तो शेतकऱ्यांचा मित्र आहे. त्यामुळे सुगरण पक्ष्याचे जतन व संवर्धन गरजेचे आहे. त्यासाठी पक्षाचे महत्व व शेतावरील बांधाचे महत्व शेतकऱ्यांना पटवून देणे काळाची गरज आहे. 
-गितांजली भाले, पक्षीमित्र 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com