वर्षाला एक लाख कोटींचा टर्नओव्हर असलेली इंडस्ट्री डबघाईला

वर्षाला एक लाख कोटींचा टर्नओव्हर असलेली इंडस्ट्री डबघाईला


औरंगाबाद: दरवर्षी धुमधडाक्यात, पंचातांरिकत हॉटेल, मंगल कार्यालयात होणाऱ्या लग्न समारंभांना कोरोनाने कात्री लागली. काही जणांना लग्नसोहळे पुढे ढकलावे लागले तर काहींनी चार ते पाच जणांच्या उपस्थितीत लग्न कार्य उकरले. या सर्वांमध्ये लग्न कार्यासोबत जुळलेल्या सर्वच लहान मोठ्या घटकांना संघर्षाचा सामना करावा लागतोय. विशेष म्हणजे दरवर्षी भारतात १ कोटींच्या जवळपास लग्न होतात.

यामधून ऑफीशयल टर्नओव्हर १ लाख कोटींच्या घरात आहे. कोरोनाच्या संकटात या सर्वांमध्ये औरंगाबादसह देशभरात वेडींग प्लॅनर इंडस्ट्रीचे हाल झाले असून हंगामातील कोट्यवधींचा व्यवसाय बुडाला आहे. आता पुढील आठ ते दहा महिने वेडींग प्लॅनिंग करुन मोठे लग्न होण्याची शक्यता कमीच आहे. विशेष म्हणजे दरवर्षी वेडींग इंडस्ट्रीमध्ये २३ टक्क्यांची वाढ होत होती. 

सर्व्हीस प्रोव्हाईडर आणि ग्राहक यांच्यामधील दुआ म्हणून वेडींग प्लॅनर काम करतात. लग्न कार्यासाठी लोअर मिडल क्लास, मिडील क्लास, हायर मिडल क्लास आणि सर्वसाधारण अशा घटकांचा समावेश होत असला तरी वेडींग प्लनिंग इंडस्ट्रीमध्ये मिडल क्लास, हायर मिडल क्लासकडे जास्त लक्ष दिले जाते. दरवर्षी लग्नाचे ८० ते १०० च्या जवळपास मुहुर्त असतात. मार्च, एप्रिल, मे या तीन महिन्यातच सर्वात मोठा हंगाम असतो. यंदा तो बुडाला. एका मोठ्या लग्नात शंभर पेक्षा जास्त घटक काम करतात.

यामध्ये हॉटेल, मंगल कार्यालय, केटरर्स, डेकोरेटर्स, बॅण्ड, सनई, पत्रिका छपाई, मेहंदी, बांगड्या, घोडी, केटरिंग, फुले, फोटो ॲण्ड व्हीडीओग्राफर, पूजेचे साहित्य, गिफ्ट बॉक्स, ट्रान्सपोर्ट, रांगोळी आणि हॉटेल, ज्वेलरी, कपडे, कुक, वॉटर जार व्यावसायिक, सिक्युरिटी, हाऊस किपिंग अशा विविध घटकांचा समावेश असतो. विशेष म्हणजे हे सर्व घटक हे असंघटीत आहे. 

औरंगाबादेत जवळपास २४ कोटींचा व्यवसाय बुडाला 

वेडींग प्लॅनिंग इंडस्ट्रीचा औरंगाबादेत सध्या जवळपास २४ कोटी रुपयांचा व्यवसाय बुडाला आहे. एका लग्नात जवळपास २५० ते ३०० जण काम करतात. मोठ्या लग्नाचे बजट हे २० ते ५० लाखांच्या पुढे असतात. एका लग्नात किमान हजार ते दीड हजारांपर्यंत वऱ्हाडी, पाहुणे येतात. या सर्वांच्या खाण्यापासून तर इतर व्यवस्थेसाठी लाखोंचा खर्च येतो. मात्र लॉकडाऊमुळे यंदा लग्न कार्य पार पडलेली नाही. त्यामुळे वेडींग प्लॅनर इंडस्ट्रीचे आर्थिक गणित बिघडले आहे. 

एकट्या औरंगाबादेतच वेडींग प्लॅनर यांना कोट्यावधी रुपयांचा फटका बसला आहे. लग्न सराईचा महत्वाचा तीन महिन्यांचा सीजन हातातून गेला आहे. आता दिवाळीनंतर सुद्धा मोठी लग्ने होण्याची शक्यता कमी आहे. आता आम्ही फक्त एकटेच नाही लग्न कार्यासोबत जुडलेल्या छोट्या-छोट्या घटकांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. याकडे अजूनही कुणीचे लक्ष दिलेले नाही. 
-राहुल बोधनकर, वेडींग प्लॅनर ॲण्ड इव्हेंट मॅनेजमेंट

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com