नरवीर तान्हाजी मालुसरे यांच्या बाराव्या पिढीत सध्या कोण काय करतेय, वाचा...

विकास देशमुख
Saturday, 18 January 2020

मालुसरे कुटुंबांतील बाराव्या पिढीत कोण-कोण सदस्य आहेत, ते सध्या काय करतात, या बाबत eSakal.com च्या वाचकांसाठी ही खास माहिती. 

औरंगाबाद - नरवीर सुभेदार तान्हाजी मालुसरे यांच्या शौर्यगाथेवर आधारित तान्हाजी चित्रपट सध्या गाजतोय. त्या अनुषंगाने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या या शूर मावळ्याच्या पराक्रमाला उजाळा मिळाला आहे. एवढेच नाही तर नरवीर तान्हाजी मालुसरे यांचे वंशजसुद्धा चर्चेत आले आहेत. त्या अनुषंगाने मालुसरे कुटुंबांतील बाराव्या पिढीत कोण-कोण सदस्य आहेत, ते सध्या काय करतात, या बाबत eSakal.com च्या वाचकांसाठी ही खास माहिती. 

हे आहेत सुभेदार तान्हाजींचे वंशज 

कोल्हापूर जिल्ह्यातील पारगड या किल्ल्याने मालुसरे कुटुंबाच्या तब्बल 11 पिढ्या पाहिल्या. बाराव्या पिढीचेही या किल्ल्याशी अतूट नाते आहे. अलीकडच्या काळात पारगडावरील मालुसरे कुटुंबातील सदस्य शिक्षण, नोकरी, व्यवसायानिमित्त बेळगाव, महाड आणि कोल्हापुरात स्थायिक झाले.

Image may contain: 5 people, people smiling, people standing and beard
अजय देवगणसह डॉ. शीतल मालुसरे

त्यापैकी (कै.) शिवराज बाळकृष्ण मालुसरे हे तान्हाजींचे थेट वंशज आहेत. वर्ष 2012 मध्ये शिवराज मालुसरे यांचे अपघाती निधन झाले. त्यांच्या पत्नी डॉ. शीतल मालुसरे, मुलगा रायबा, मुली अंकिता आणि देवयानी सध्या रायगड जिल्ह्यातील महाड येथे वास्तव्याला आहेत.

उघडून तर पाहा - या ठिकाणी अजूनही सुरक्षित आहे तान्हाजींची तलवार अन् माळ, पाहा PHOTOS

डॉ. शीतल महाड येथे शिक्षिका आहेत. त्यांनी तान्हाजी मालुसरे यांच्यावर पीएच. डी. केलेली आहे. तसेच त्या राज्यात आणि राज्याबाहेर छत्रपती शिवाजी महाराज, नरवीर तानाजी मालुसरे यांच्या जीवनावर व्याख्याने देतात. तसेच कवयित्री म्हणून त्यांनी साहित्यक्षेत्रात स्वतःचा असा ठसा उमटवला आहे.

Image may contain: 1 person
रायबा मालुसरे

राबया, अंकिता आणि देवयानी मालुसरे काय करतात? 

रायबा यांचे केईएस इंग्लीश स्कूलमधून माध्यमिक शिक्षण झालेले असून, ते सध्या पुणे येथे एएसएमएसएस इन्स्टिटूट ऑफ बिजनेस मॅनेजमेंट ऍण्ड रिसर्ज सेंटरमध्ये एमबीएचे शिक्षण घेत आहेत. अंकिता या बीबीए करत आहेत. देवयानी यांचेही माध्यमिक शिक्षण केईएस इंग्लीश स्कूलमधूनच झालेले असून, त्या टीबीके कॉलेज भरणे खेड येथे बीएडच्या विद्यार्थिनी आहेत.

Image may contain: 1 person, smiling, closeup
देवयानी मालुसरे

हा आहे पारगडचा इतिहास 

डॉ. शीतल मालुसरे यांनी सांगितले की, पोर्तुगीजांवर वचक ठेवण्यासाठी शिवरायांनी इसवी सन 1676 मध्ये पारगड हा किल्ला (ता. चंदगड, जि. कोल्हापूर) बांधला. तान्हाजी मालुसरे यांना स्वराज्यासाठी वीरमरण आले. स्वतःच्या पुत्राचे लग्न पुढे ढकलून नरवीर तान्हाजी हे स्वराज्यासाठी मोहिमेवर गेले होते. त्यांच्या वीर मरणानंतर काही महिन्यांनी त्यांचे पुत्र रायबा यांचे लग्न झाले. त्यानंतर छत्रपतींनी रायबा यांना पारगड या किल्ल्याचे किल्लेदार केले.

शेलार मामांचे वंशजही पारगडावर 

पारगडावर नरवीर तानाजी मालुसरे यांच्या वंशजासह शेलार मामांचे वंशजही आहेत. त्यांच्याकडे इतिहासातील अनेक महत्त्वाच्या नोंदी उपलब्ध आहेत. विशेष म्हणजे खुद्द शिवाजी महाराज काही दिवस या किल्ल्यावर राहिले होते. निसर्गाच्या कुशीत असलेला हा किल्ला आजही दिमाखात उभा आहे. 

हेही वाचा - या शिक्षिकेच्या सल्ल्याने अजय देवगणने केले तान्हाजीत बदल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: What Descendants of Tanhaji Malusare Doing Maharashtra News