शिवसेनेवर दबाव टाकणारे कोण आहेत अब्दुल सत्तार? 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 4 जानेवारी 2020

औरंगाबाद जिल्हा सत्तार यांना सिल्लोडचे आमदार म्हणून ओळखत असला, तरी आता जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत कळीचे व्यक्तिमत्व ठरलेल्य़ा सत्तार यांची पार्श्वभूमी नेमकी काय आहे, ते वाचा-  

औरंगाबाद : महाविकास आघाडीच्या सरकारात राज्यमंत्रीपद मिळाल्याने नाराज होऊन राजीनामा देणारे आमदार अब्दुल सत्तार नेमके आहेत तरी कोण, अशी उत्सुकता सर्वांनाच असणार.

औरंगाबाद जिल्हा सत्तार यांना सिल्लोडचे आमदार म्हणून ओळखत असला, तरी आता जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत कळीचे व्यक्तिमत्व ठरलेल्य़ा सत्तार यांची पार्श्वभूमी नेमकी काय आहे, ते वाचा-  

Image result for abdul sattar

'सत्ता तिथे सत्तार' अशी ओळख असणारे अब्दुल सत्तार हे सिल्लोड शहरातील अत्यंत गरीब कुटुंबातून पुढे आले. मोलमजुरी, हमाली करून त्यांनी शिक्षण पूर्ण केले. याच दरम्यान छोटासा सायकल दुकान व्यवसाय सुरु केला.

1984 साली सिल्लोड ग्रामपंचायतची निवडणूक लढवून जिंकली. माजी मंत्री कै.बाबूरावजी काळे, सहकार महर्षी कै. बाळासाहेब पवार, शिक्षण व सहकार महर्षी कै.माणिकरावजी पालोदकर यांच्यासोबत राजकारणामध्ये काम करण्याची व राजकारण शिकण्याची त्यांना संधी मिळाली. 

सिल्लोड नगरपरिषदेचे पहिले नगराध्यक्ष

1994 साली सिल्लोड नगरपरिषदेची पहिली निवडणूक झाली. सिल्लोड नगरपरिषदेचे पहिले नगराध्यक्ष झाले. नगरपरिषदेच्या वीस वर्षाच्या सत्ता कार्यकाळात अडीच-तीन वर्षे सोडता पूर्ण कार्यकाळ अब्दुल सत्तार दाम्पत्यांनी नगराध्यक्ष पद भूषविले आहे व आजही सत्ता त्यांच्याचकडेच आहे. 

Image result for abdul sattar

वाचा - जिल्हा परिषदेत काय होणार?

विविध शिक्षण संस्था, जिल्हा मध्यवर्ती सहकार बॅंक, हज कमेटी, रोजगार हमी योजना, पंचायत राज आदि शासकीय समित्यांसह विविध समित्यांवर त्यांनी काम केले आहे. 

शंकरराव चव्हाण यांनी दिला कॉंग्रेस पक्षात प्रवेश

कै.शंकरराव चव्हाण यांनी अब्दुल सत्तार यांना कॉंग्रेस पक्षात नुसता प्रवेश दिला नाही तर 2001 साली स्थानिक स्वराज्य संथा मतदार संघातून विधानपरिषदेची उमेदवारी मिळवून दिली. विरोधकांवर मात करत ते विधानपरिषद सदस्य झाले.

कॉंग्रेस पक्षाने अब्दुल सत्तार यांच्या कामाची पद्धत पाहून 2004 साली सिल्लोड विधानसभा मतदार संघातून उमेदवारी दिली पण त्यांचा 301 मतांनी निसटता पराभव झाला. 2007 मध्ये विधान परिषदेतही त्यांना पराभव स्वीकारावा लागला. 

विधानसभेची निवडणूक जिंकली

2009 मध्ये सत्तार यांना पक्षाने सिल्लोड विधानसभा मतदार संघातून उमेदवारी दिली. याच दरम्यान एकाकाळाचे त्यांचे राजकीय नेतृत्व असलेले परंतु काही कारणास्तव 1996 ते 2008 पर्यंत दूर गेलेले जि.प.चे माजी अध्यक्ष प्रभाकरराव पालोदकर यांच्या सोबत सुत जुळले व त्यांच्या मदतीने अब्दुल सत्तार यांनी विधानसभेची निवडणूक मोठ्या फरकाने जिंकली. तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी त्यांना कैबिनेट मंत्री पद देऊन पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्य व्यवसायाचे खाते दिले. 

Image result for abdul sattar

2014 च्या विधानसभा निवडणुकीतही भाजपचे सुरेश बनकर यांचा पराभव करून ते 13 हजार 991 मतांनी निवडून आले. 2019 मध्ये शिवसेनेत प्रवेश करत त्यांनी धनुष्यबाणाचा प्रचार करून आमदारकी मिळवली आणि राज्यमंत्रीपदही मिळवले. 

याच राज्यमंत्रीपदाचा त्यांनी आठवडा उलटण्याच्या आत राजीनामा दिला आहे. 

वाचा - सत्तारांच्या राजीनाम्यावर काय म्हणतात संजय राऊत?


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Who Is Abdul Sattar Sillod MLA Aurangabad News