भय इथले संपत नाही!

मनोज साखरे
Monday, 20 January 2020

महाविद्यालयीन तरुणी, शाळकरी, नोकरदार महिला असो; वा गृहिणी छेडछाडीचे चक्र पाठ सोडताना दिसत नाही. मुलींची टिंगलटवाळी व अश्‍लील वर्तनाने अनेकजणी त्रस्त असतात. सोशल साईटद्वारे छेडछाड, धमकाविण्याचे प्रकारही वाढतेच आहेत.
 

औरंगाबाद : शहरात स्कूलबसमध्ये एका गतिमंद मुलीसोबत गैरप्रकार झाला. त्यामुळे मुली, तरुणी आणि महिलांच्या सुरक्षेचा प्रश्‍न पुन्हा ऐरणीवर आला  आहे. 

दिल्लीतील निर्भया प्रकरण असो; की हैदराबादेतील दिशावरील अत्याचार व खून. एकट्या-दुकट्याने जाणाऱ्या महिला, तरुणींसह शालेय मुलींच्या सुरक्षेचा प्रश्‍न दिवसेंदिवस गंभीर होत असल्याचे यातून दिसून येत असून, भय इथले संपत नाही, असेच म्हणण्याची वेळ आली आहे.

एकीकडे सोशल मीडियाद्वारे मुलींबाबतची विकृती वाढत असतानाच छेडछाडीचा प्रश्‍नही सातत्याने सतावत आहे. शाळा, महाविद्यालयांत जाणाऱ्या विद्यार्थिनी पदोपदी टवाळखोर, रोडरोमिओंच्या विळख्यात सापडत आहेत.

महाविद्यालयीन तरुणींची छेडछाड ही अत्यंत गंभीर समस्या आहे.
वर्ष 2015 मध्ये रिक्षाचालकाकडून शालेय मुलीच्या लैंगिक शोषणाची बाब उघड झाली होती. या घटनेने पूर्ण शहराला हादरवून सोडले. टवाळखोरांकडून सुरवातीलाच होणारी छेडछाड न रोखल्यास त्याचे नंतर गंभीर परिणाम होत असल्याचे सिडकोतील एका तरुणीच्या बळीमुळे समोर आली.

अशाच स्थितीत शहरातील महाविद्यालयीन विद्यार्थिनी छेडछाडीच्या शिकार बनत आहेत. गतिमंद मुलीसोबत झालेल्या प्रकारानंतर पुन्हा हा विषय अत्यंत चिंताजनक बनला आहे. विशेषत: शालेय वाहतूक करताना मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न उभा ठाकला आहे. पालकांच्या माघारी मुलीसोबत घडत असलेल्या प्रकारांनी चिंता अधिकच वाढत आहे.

हेही वाचा - एका क्‍लिकवर वाचा औरंगाबादची गुन्हेगारी     

महिलांशी संबंधित अत्याचाराचे शहरातील गुन्हे

गुन्ह्यांचा प्रकार : 2019 नोव्हेंबरपर्यंत  गुन्हे
पळवून नेणे, अपहरण  126 गुन्हे
विनयभंग, छेडछाड  272 गुन्हे
बलात्कार    78 गुन्हे
अनैतिक व्यापार प्रतिबंध कायदा      2     गुन्हे

 

हेही वाचा - चौघींच्या दादल्याने टाकले एकीच्या खात्यात 14 लाख अन..मग असं झालं 

No photo description available.
छेडछाडीचे दुष्टचक्र कायम

महाविद्यालयीन तरुणी, शाळकरी, नोकरदार महिला असो; वा गृहिणी छेडछाडीचे चक्र पाठ सोडताना दिसत नाही. मुलींची टिंगलटवाळी व अश्‍लील वर्तनाने अनेकजणी त्रस्त असतात. सोशल साईटद्वारे छेडछाड, धमकाविण्याचे प्रकारही वाढतेच आहेत.
 

Image may contain: 1 person
असा हा उपद्रव

घरातून बाहेर पडल्यानंतर महाविद्यालय व इतर ठिकाणी जाताना टवाळखोरांच्या उपद्रवाचा तरुणी, मुलींना सामाना करावा लागतो. टोमणे, शेरेबाजी ऐकत, धक्के खात मुलींचा प्रवास सुरू असतो. कट मारून पाठलाग करणे, समोरून जोरात दुचाकी दामटणे, मुलींना वाहनांच्या गराड्यात घेऊन, घाबरवून सोडण्याचे प्रकार होत आहेत.

वेसन घालायला हवी

  • मुलींच्या छेडछाड करणाऱ्या टवाळखोरांना वेसन घालण्याची अत्यंत गरज आहे.
  • दामिनी पथकांसोबतस छेडछाड विरोधी पथकांची संख्या वाढविण्याची गरज आहे.
  • बसस्थानक, रेल्वेस्थानक, बसस्टॉप, सार्वजनिक ठिकाणांवर जास्त वेळ तैनात असावीत. सातत्यही हवे.
  • टवाळखोर, सडकसख्याहरींवर नजर ठेवून ठोस कारवाईची गरज.
  • याची आहे गरज
  1. सिडको, मध्यवर्ती बसस्थानक, औरंगपुरा बसस्टॉप, कार्तिकी हॉटेललगत बसस्टॉपसह महत्त्वाच्या स्टॉपवर सुरक्षितता हवी.
  2. प्रवासासाठी बहुतांश महाविद्यालयीन विद्यार्थिनी अशा ठिकाणी उभ्या असतात. तेथे टवाळखोरांपासून संरक्षणाची गरज.
  3. बस, रिक्षा व इतर खासगी वाहनांतून शालेय मुलींची वाहतूक होताना योग्य ती खबरदारी घेण्याची गरज आहे.
  4. ही खबरदारी न घेणाऱ्या यंत्रणांवरही बडगा उगारण्याची गरज.
  5. मुलींच्या सुरक्षित वाहतुकीसाठी नुसत्या समित्या गठित असतात, त्यांनी तत्परतेने कार्य करण्याची आवश्‍यकता आहे.  

हेही वाचा - याच्यावर आहे चाळीसपेक्षा अधिक गुन्हे औरंगाबादेतून चोरले होते सत्तर तोळे सोने 

हेही वाचा - नाशिकच्या मुलीसोबतही झाला होता तो प्रकार!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Women Fear Wont End In Aurangabad