तक्रारीची दखल न घेतल्याने महिला चढली जलकुंभावर

Womens Sholay Style Protest in Aurangabad
Womens Sholay Style Protest in Aurangabad

औरंगाबाद - उपोषणाची दखल न घेतल्याने राष्ट्रीय निवारा परिषदेच्या महिला जिल्हाध्यक्षांनी शिवाजीनगर येथील पाण्याच्या टाकीवर जाऊन आंदोलन सुरू केले. ही बाब समजताच उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांच्यासह पोलिसांनी धाव घेत महिलेची समजूत काढून त्यांना सुखरूप खाली उतरविले.  हा प्रकार गुरुवारी (ता.17) सायंकाळी चारच्या सुमारास घडला. 

राष्ट्रीय निवारा परिषदेच्या जिल्हाध्यक्षा शालूताई भोकरे यांनी तीन जानेवारीला प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे निवेदन दिले होते. यानुसार प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या एका अधिकाऱ्याचे केमिकल माफियांसोबत संबंध आहेत. त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून खातेनिहाय त्यांची चौकशी व्हावी व त्वरित बदली करावी असा आशय निवेदनात होता. वाळूज एमआयडीसीत ऍल्युमिनिअम भट्ट्या मोठ्या प्रमाणात सुरू असून, पर्यावरणाला ही बाब घातक आहे. आरोग्याला धोका निर्माण होत असल्याचेही निवेदनात नमूद होते. या तक्रारीची प्रदूषण नियंत्रण मंडळ दखल घेत नसल्यामुळे त्या शुक्रवारी शिवाजीनगर भागातील पाण्याच्या टाकीवर चढल्या. ही बाब उपमहापौर जंजाळ यांना समजल्यानंतर त्यांनी नियंत्रण कक्षाला संपर्क साधला. दरम्यान, जवाहरनगर पोलिस पाण्याच्या टाकीजवळ पोचले. महिलेची पोलिस व इतरांनी समजूत घालण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्यांनी निवेदनाची
कागदपत्रे नागरिकांच्या दिशेने फेकली. 
 
असे उतरविले सुखरूप 
उपमहापौरांसोबतच्या सहकाऱ्यांनी निवदेनावरील संपर्क क्रमांकावर कॉल केला व टाकीवर असलेल्या महिलेशी संवाद साधला. त्यांची समजूत काढीत पोलिस अधिकारी, कर्मचारी व काही नागरिक टाकीवर चढले व त्यांनी महिलेला सुखरूप खाली आणले. 
 
कारवाईचे आश्‍वासन 
श्रीमती भोकरे यांनी त्यांच्या मागणीसाठी राजमाता जिजाऊ जयंतीदिनी उपोषणही केले होते. मात्र, संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई होत नसल्याने शुक्रवारी त्यांनी हे पाऊल उचलले. उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांनी सांगितले, की या प्रकाराबाबत प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या संबंधितांना संपर्क साधून माहिती दिली. त्यांच्याकडून कारवाईबाबत आश्‍वासन महिलेला देण्यात आले आहे. 

हेही वाचा - 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com