Video ; होय! औरंगाबादेत लघुउद्योजकांकडून कृत्रिम श्वासोच्छवास यंत्राची निर्मिती

Aurangabad News
Aurangabad News

औरंगाबाद : विकसित राष्ट्रांना जेरीस आणणारा कोरोना व्हायरस भारतातही पसरला आहे. त्यातच व्हेंटिलेटर कमी आणि लोकसंख्या जास्त अशी स्थिती आहे. सामाजिक भान जपत औरंगाबादेतील लघुउद्योजकांनी व्हेंटिलेटरला पर्याय म्हणून गरजेपुरते कृत्रिम श्वासोच्छवास यंत्र तयार केले आहे. अवघ्या १५ हजारात तयार झाले असून ‘कांचन पीसीबी’ नावाने हे उत्पादन लवकरच रुग्णांच्या कामी येईल. असा विश्वास उद्योजक सुनील किर्दक यांनी व्यक्त केला.

कोरोनामुळे भारत लॉकडाऊन आहे. त्यात उद्योगही बंद आहेत. उद्योजकांचे प्रचंड आर्थिक नुकसान होत आहे. देशासमोरील महामारी रोखण्यासाठी उद्योजक वेगवेगळ्या तऱ्हेने पुढे येत आहेत. देशात व्हेंटिलेटरची कमतरता आहे तसेच, महागडे व्हेंटिलेटर उपलब्ध होण्याची शक्यताही कमी आहे. त्यामुळेच व्हेंटिलेटरला पर्याय म्हणुन कृत्रिम श्वासोच्छवास यंत्र तयार करत कोरोना रुग्णांची मूलभूत गरज पूर्ण करण्याचे उद्दिष्ट लघुउद्योजकांनी ठेवले आहे.

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

पुणे येथील कॅप्टन भरूचा यांनी हे यंत्र डिझाईन केले आहे. विकास चैतन्य आणि अशोक सराफ यांना औरंगाबादेत युनिट सुरु करण्यासाठी विचारणा झाली. त्यानंतर दहा दिवसांपासूनच यंत्र निर्मितीला सुरुवात केली आहे. दोन यंत्र बनवली असून आठवड्याभरात आणखी सुधारणा करण्यात येणार आहेत. पंधरा हजार रुपये खर्च खर्च आला असून तो कमी करण्याचा प्रयत्न सुरु आहे. प्लास्टिक, रबर, शीटमेटल, मशिनींग, इलेक्ट्रिकल या वेगवेगळ्या आघाड्यांवर लघुउद्योजकांची टीम कार्यरत आहे.

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

लॉकडाऊनमुळे होतेय अडचण
लॉकडाऊनमध्ये कंपन्या बंद आहेत, त्यामुळे आवश्‍यक पार्ट मिळायला अडचणी येत आहेत. हेच आव्हान यासाठी त्यांचे प्रयत्न आहेत. प्रोजेक्टवर काम करण्यासाठी पोलिसांनी परवानगी दिली आहे. टीममध्ये टुलटेक टुलिंगचे सुनिल किर्दक, लेसोकार्टचे प्रतीक पाटील, शिवम इंडस्ट्रीजचे शार्दुल, टुलरुमचे हितेश पाटील आणि ‘कांचन पीसीबी’चे विकास चैतन्य यांचा समावेश आहे.

महाराष्ट्रातील इतर बातम्या बाचण्यासाठी - क्लिक करा


आम्ही बनवलेले यंत्र सेमी ऑटोमेशन आणि मॅन्युअल मोडवर ही चालेल. त्यामुळे लाईट जाते, त्यावेळीही वापरता येईल. यशस्वी झालो आहोत. आयडियल ट्रायल, लॅबमध्ये ट्रायल त्यानंतर मग रुग्णांवर त्याचा वापर होईल. आठ ते दहा कालावधी लागु शकतो.
- सुनिल किर्दक, उद्योजक औरंगाबाद

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com