धक्कादायक : दोन मुलांच्या आईला तो म्हणाला, पतीला फारकत दे; मग...

 Youth Held on Charge of Cheating
Youth Held on Charge of Cheating

औरंगाबाद : ‘‘पतीला फारकत दे मी तुझ्याशी लग्न करून मुलाबाळांना सांभाळतो, असे आमिष दाखवत जयभवानीनगरातील तरुणाने विवाहितेचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी हर्सूल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रोहन चंद्रकांत कुंटलगारलू (वय २५, रा. घर क्र. एफ-४०, जयभवानीनगर, कामगार चौक, एन-४, सिडको) असे आरोपीचे नाव आहे. त्याचा हर्सूल पोलिस शोध घेत आहेत. 

पिसादेवी रोडवरील एका २७ वर्षीय विवाहितेचा पती भारतीय सैन्यदलात एक वर्षापासून जम्मू-काश्मीर येथे कार्यरत आहे. या विवाहितेला एक मुलगी व मुलगा आहे. सप्टेंबर २०१९ मध्ये विवाहितेची धाकटी बहिण नृत्याची शिकवणी घेत होती. त्यावेळी तिच्याकडे शिकवणीच्या कामासाठी येणाऱ्या सचिन गायकवाड याच्यासोबत रोहन कुंटलगारलू हा यायचा. त्यावेळी पीडित विवाहितेची त्याच्यासोबत ओळख झाली. त्यानंतर विवाहिता व रोहन अधून-मधून भेटू लागले. 
 
हृदयद्रावक : नोकरी गेली, म्हणाला, ‘सोडून जाणार नाही मी तुला’ अन्...

यायचा घरी

विवाहितेची बहीण शिकवणीला गेल्यावर रोहन घरी यायचा. त्यामुळे ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. त्यानंतर त्याने पतीला फारकत दे मी तुझ्याशी लग्न करतो असे म्हणाला. मात्र, विवाहितेने त्याला नकार दिला होता. पण त्याने जवळीक साधत डिसेंबर २०१९ पासून वेळोवेळी विवाहितेशी शारीरीक संबंध प्रस्थापित केले. दरम्यान, रोहन याने पीडितेला २६ मे रोजी रात्री बाराच्या सुमारास आपल्या घरी नेवून पतीला फारकत दे मी तुझ्याशी लग्न करतो असे सांगितले.

त्यावेळी पीडितेने पतीला फारकत देण्यास संमती दर्शवली. त्यानंतर रोहनने २७ मे रोजी मी, तुझ्याशी लग्न करणार नाही, असे म्हणत घरातून पळून गेला. त्यामुळे त्याच्या आई-वडिलांनी देखील विवाहितेला घराबाहेर हाकलून दिले. याप्रकारानंतर अखेर विवाहितेने हर्सूल पोलिस ठाणे गाठत रोहनविरुद्ध अत्याचाराची तक्रार दिली. याप्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक नितीन कामे करत आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com