esakal | मोबाईल चार्जर देण्यासाठी गेलेल्या तरुणीवर अत्याचार, नराधम चार महिन्यांनंतर अटकेत
sakal

बोलून बातमी शोधा

1crime_33

मोबाईल चार्जर देण्यासाठी गेलेल्या एका २१ वर्षीय तरुणीला चाकूचा धाक दाखवून शेंद्रा येथील तरुणाने अत्याचार केला. त्यानंतर तिचे नग्न फोटो काढून ते व्हायरल करण्याची व कुटुंबीयांना ठार मारण्याची धमकी देत तिच्यावर वारंवार अत्याचार करणाऱ्या नराधमाला सिडको पोलिसांनी तब्बल चार महिन्यांनंतर गुरुवारी (ता.तीन) सकाळी अटक केली.

मोबाईल चार्जर देण्यासाठी गेलेल्या तरुणीवर अत्याचार, नराधम चार महिन्यांनंतर अटकेत

sakal_logo
By
सुषेन जाधव

औरंगाबाद : मोबाईल चार्जर देण्यासाठी गेलेल्या एका २१ वर्षीय तरुणीला चाकूचा धाक दाखवून शेंद्रा येथील तरुणाने अत्याचार केला. त्यानंतर तिचे नग्न फोटो काढून ते व्हायरल करण्याची व कुटुंबीयांना ठार मारण्याची धमकी देत तिच्यावर वारंवार अत्याचार करणाऱ्या नराधमाला सिडको पोलिसांनी तब्बल चार महिन्यांनंतर गुरुवारी (ता.तीन) सकाळी अटक केली. शिवाजी आनंद चौधरी (३६, रा. नायगाव ता. जायगाव जि. नांदेड, ह.मु. शिवाजीनगर, शेंद्रा) असे आरोपीचे नाव आहे.

प्रकरणात नांदेड जिल्ह्यातील २१ वर्षीय पीडितेने फिर्याद दिली. त्यानुसार, पीडिता ही सिडको किरायाच्या खोलीत राहत असताना, १२ मे २०१८ रोजी आरोपी शिवाजी चौधरी हा पीडितेच्या बहिणीला मूळगावाहून घेऊन पीडितेच्या घरी आला होता. १३ मे २०१८ रोजी तरुणी तिच्या बहिणीसोबत गच्चीवर झोपलेली असताना रात्री साडेबाराच्या सुमारास शिवाजीने तिच्याकडे मोबाईल चार्जरची मागणी केली. त्यामुळे तरुणी चार्जर देण्यासाठी घरात आली. त्यावेळी शिवाजीने तिला चाकूचा धाक दाखवून अत्याचार केला.

 त्यानंतर तिचे नग्न फोटो काढून ते व्हायरल करण्याची धमकी दिली. तसेच मोबाईलवर चॅटिंग व तिचे नग्न फोटो पाठविण्यास भाग पाडले. याप्रकरणी सुरुवातीला मुखेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर हे प्रकरण सिडको पोलिस ठाण्याकडे वर्ग करण्यात आले आहे. आरोपीला अटक करून गुरुवारी (ता.तीन) न्यायालयात हजर करण्यात आले असता, आरोपीला शनिवारपर्यंत (ता.पाच) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. यू. न्याहारकर यांनी दिले. या प्रकरणात सहायक सरकारी वकील सय्यद शहनाज यांनी काम पाहिले.

Edited - Ganesh Pitekar