आैरंगाबादच्या गोदावरी महापंचायतसाठी सायकल जलदिंडी रवाना

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 23 ऑगस्ट 2019

नाशिक ः औरंगाबाद येथे उद्यापासून (ता. 24) दोनदिवसीय पाणी परिषद व गोदावरी महापंचायत होत आहे. त्यामध्ये गोदावरी अविरल, निर्मल व स्वतंत्र रहावी यासाठीचे विचारमंथन होणार आहे. गोदावरी खोऱ्यात पाण्यावर काम करणारे लोक, सरकार, प्रशासन आणि जलतज्ज्ञ यांच्या उपस्थितीत ही महापंचायत होत आहे. या महापंचायतसाठी नाशिक सायकलिस्ट फाऊंडेशनचे पदाधिकारी आज पहाटे गोदावरीचे तीर्थ घेऊन रामकुंडावरुन औरंगाबादकडे रवाना झाले. नाशिक ते औरंगाबादच्या प्रवासात जलसंवर्धन, बचत, पुनर्वापर याबद्दलचे प्रबोधन सायकलिस्ट करतील. औरंगाबादचे विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ.

नाशिक ः औरंगाबाद येथे उद्यापासून (ता. 24) दोनदिवसीय पाणी परिषद व गोदावरी महापंचायत होत आहे. त्यामध्ये गोदावरी अविरल, निर्मल व स्वतंत्र रहावी यासाठीचे विचारमंथन होणार आहे. गोदावरी खोऱ्यात पाण्यावर काम करणारे लोक, सरकार, प्रशासन आणि जलतज्ज्ञ यांच्या उपस्थितीत ही महापंचायत होत आहे. या महापंचायतसाठी नाशिक सायकलिस्ट फाऊंडेशनचे पदाधिकारी आज पहाटे गोदावरीचे तीर्थ घेऊन रामकुंडावरुन औरंगाबादकडे रवाना झाले. नाशिक ते औरंगाबादच्या प्रवासात जलसंवर्धन, बचत, पुनर्वापर याबद्दलचे प्रबोधन सायकलिस्ट करतील. औरंगाबादचे विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांचे महापंचायतसाठी विशेष सहकार्य लाभले असल्याची माहिती आयोजन समितीचे सदस्य राजेश पंडित यांनी दिली. सायकल जलदिंडीमध्ये ऐश्‍वर्या वाघ, डॉ. मनिषा रौंदळ, चंद्रकांत नाईक, दविंदर भेला, सुरेश डोंगरे, दीपक भोसले, सतीश महाजन, रवींद्र दुसाने, नरेंद्र कन्सारा, गणेश माळी, ज्ञानेश्‍वर गायकवाड, रवी लोखंडे, प्रकाश लोखंडे, रत्नाकर आहेर, किशोर काळे, विशाल उगले हे सहभागी झाले आहेत. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sakal News Godawari