लातुरात गोळीबारात तरुण ठार

हरी तुगावकर
बुधवार, 25 सप्टेंबर 2019

एकाने गोळीबार केल्याने दुसरा तरुण ठार झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी माजी सैनिकाला त्याच्या मुलासह अटक केली आहे.

लातूर : येथील प्रकाशनगर भागात किरकोळ कारणावरून मित्रा मित्रात  भांडण झाले. यातून एकाने गोळीबार केल्याने दुसरा तरुण ठार झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी माजी सैनिकाला त्याच्या मुलासह अटक केली आहे. ही घटना मंगळवारी (ता. 24) रात्री घडली. चार दिवसातील गोळीबार होण्याची ही दुसरी घटना आहे.

येथील प्रकाशनगर भागात राहूल मन्नाडे व गणेश गायकवाड हे दोघे मित्र आहेत. त्यांच्या मंगळवारी रात्री एका टपरीवर किरकोळ कारणावरून भांडण झाले. त्यानंतर गणेश गायकवाड घरी गेला. थोड्या वेळानंतर तो बाहेर आला. पुन्हा राहूल मन्नाडे व त्याच्यात भांडण झाले. यात गोळीबार करण्यात आल्याने राहूल मन्नाडे हा गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने शासकीय रुग्णालयात नेण्यात आले. उपचार सुरु असताना त्याचा रात्री मृत्यू झाला. या प्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी  माजी सैनिक अण्णासाहेब गायकवाड व त्याचा मुलगा गणेश गायकवाड यांना अटक केली आहे.

गेल्या चार दिवसातील गोळीबाराची ही दुसरी घटना आहे. येथील एमआयडीसमध्ये एका तरुणावरच दोन मोटार सायकलस्वारांनी गोळी झाडल्याने तो गंभीर जखमी झाला होता. आता ही घटना घडली असून यात तरुण ठार झाला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 1 boy died in firing at Latur